Home Uncategorized शेणीच्या मोबदल्यात स्मशानभूमीतील राख उपलब्ध ; महापालिकेचा उपक्रम

शेणीच्या मोबदल्यात स्मशानभूमीतील राख उपलब्ध ; महापालिकेचा उपक्रम

18 second read
0
0
10

no images were found

शेणीच्या मोबदल्यात स्मशानभूमीतील राख उपलब्ध ; महापालिकेचा उपक्रम

कोल्हापूर, : शहरातील पंचगंगा, कदमवाडी, कसबा बावडा व बापट कॅम्प येथील चारही स्मशानभूमींमध्ये महापालिकेमार्फत मोफत अंत्यविधीची सुविधा दिली जाते. अंत्यविधीनंतर निर्माण होणारी रक्षा (राख) रक्षाकुंडामध्ये संकलित केली जाते. या रक्षेचा महापालिकेस उपयोग नसल्याने ती शेतीच्या कामासाठी इच्छुक शेतकरी, सामाजिक संस्था व नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

            या रक्षेच्या मोबदल्यात संबंधितांनी महापालिकेच्या स्मशानभूमींना शेणीचा पुरवठा करणे आवश्यक आहे. तसेच रक्षा घेऊन जाण्यासाठी संबंधितांनी स्वतःचे वाहन व मनुष्यबळाची व्यवस्था करावी लागणार आहे.

       रक्षा घेण्यास इच्छुक शेतकरी, सामाजिक संस्था व नागरिकांनी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे मागणी अर्ज सादर करावा. अर्जासोबत रक्षेचा कोणत्याही प्रकारे दुरुपयोग करणार नसल्याबाबतचे स्टॅम्पवरील प्रतिज्ञापत्र, आवश्यक कागदपत्रे तसेच एका वर्षात महापालिकेस किती शेणीचा पुरवठा करणार आहेत, याचा तपशील नमूद करणे आवश्यक आहे.

        महापालिकेस जास्तीत जास्त शेणीचा पुरवठा करणाऱ्या शेतकरी, सामाजिक संस्था व नागरिकांना उपलब्धतेनुसार स्मशानभूमीतील रक्षा (राख) देण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

कलाकार सांगतात कसे खेळ त्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शारीरिक आणि मानसिक संतुलन राखायला मदत करतात

फिटनेसपासून फोकसपर्यंत: सोनी सब कलाकार सांगतात कसे खेळ त्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्…