Home प्रकाशन पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांच्या ‘चूजिंग गोल्ड’ या आत्मचरित्राचे प्रकाशन

पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांच्या ‘चूजिंग गोल्ड’ या आत्मचरित्राचे प्रकाशन

1 min read
0
0
6

no images were found

पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉसौरभ गाडगीळ यांच्या ‘चूजिंग गोल्ड‘ या आत्मचरित्राचे प्रकाशन

१९४ वर्षांच्या वारशाला नवी दिशा देणाऱ्या सहाव्या पिढीतील उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास

पुणे,: भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित सराफी व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्सचा वारसा वयाच्या मध्यतिशीत स्वीकारलेल्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉसौरभ गाडगीळ यांनी आपल्या आयुष्यातील अनुभवसंघर्षनिर्णय आणि नेतृत्वाचा प्रवास शब्दबद्ध केला आहेत्यांचे आत्मचरित्र ‘चूजिंग गोल्ड‘ हे पेंग्विन रँडम हाऊस इंडिया यांनी राष्ट्रीय स्तरावर प्रकाशित केले आहे.

       ‘चूजिंग गोल्ड‘ हे अत्यंत प्रामाणिक आणि वैयक्तिक अनुभवांवर आधारित असे पुस्तक आहेभारतातील सर्वात जुन्या व्यावसायिक वारशांपैकी एकाचा वारसा तरुण वयात स्वीकारल्यानंतरआज वयाच्या एकोणपन्नाशीत डॉसौरभ गाडगीळ यांनी आपल्या आयुष्याच्या प्रवासाकडे मागे वळून पाहत त्यातील अनुभवसंघर्षनिर्णय आणि शिकवणी यांचा प्रांजळ वेध घेतला आहेहा प्रवास बाहेरच्या जगाला दिसणाऱ्या यशाचा नसूनत्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या वास्तवाचा आणि त्यातून घडलेल्या व्यक्तिमत्त्वाचा आहे.

      या आत्मचरित्रात डॉसौरभ गाडगीळ यांच्या आयुष्याला आकार देणारे अनेक महत्त्वाचे क्षणआजोबा आणि आई यांच्यासोबतचे आयुष्यभर स्मरणात राहिलेले संवादकाळाच्या ओघात उमगलेल्या गोष्टी तसेच त्यांच्या विश्वासधैर्य आणि मूल्यांची कसोटी पाहणारे अनेक कठीण निर्णय यांचा प्रामाणिक वेध घेण्यात आला आहे१९४ वर्षांच्या पीएनजी ज्वेलर्सच्या समृद्ध वारशाची पार्श्वभूमी या कथेला लाभली असलीतरी या पुस्तकाचा केंद्रबिंदू हा स्वतः डॉगाडगीळ यांचा व्यक्तिमत्त्व विकासत्यांचा संघर्षत्यांनी घेतलेले निर्णय आणि परंपरेचा सन्मान राखत स्वतःचा स्वतंत्र मार्ग घडवण्याचा प्रेरणादायी प्रवास हा आहे.

     पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉसौरभ गाडगीळ म्हणाले, “आयुष्य जगताना स्वतःसाठी जो वेळ मिळतोज्यात आपण मागे वळून पाहतोतशी संधी मला कधी मिळाली नाहीया पुस्तकाच्या निमित्तानं पहिल्यांदाच ही संधी मिळालीस्वतःशी संवाद साधत अनेक प्रश्नांना या निमित्तानं मला सामोरं जाता आलंआजपर्यंत मी घेतलेल्या कोणत्या निर्णयांचा मला खऱ्या अर्थानं अभिमान आहेकोणत्या निर्णयाबाबत आजही मनात सल आहेकोणते निर्णय अनुभवाच्या जोरावर योग्य ठरले आणि कोणते केवळ नशिबाच्या साथीनं योग्य ठरलेया सगळ्या मला पडलेल्या प्रश्नांना मी दिलेलं प्रामाणिक उत्तर म्हणजे ‘चूजिंग गोल्ड‘ हे पुस्तकत्यात कोणताही आडपडदा नाही किंवा यशानंतर निर्माण होणाऱ्या परिपूर्णतेचा कोणता आवही नाही.”

      “हे पुस्तक लिहिताना मला सर्वाधिक आश्चर्य वाटले ते म्हणजे माझ्या आयुष्याला आकार देणारे अनेक क्षण किती साधे आणि शांत होतेआजोबांसोबत झालेला एक संवादस्वतःपासूनही लपवून ठेवलेले एक अपयश किंवा पंचविशीत दुर्लक्षित केलेला एखादा सल्लाज्याचा खरा अर्थ अनेक वर्षांनंतर उमगलाया क्षणांनी मला बॅलन्स शीटमधील आकड्यांपेक्षा अधिक घडवले.

      हे पुस्तक मी त्या प्रत्येक स्वप्नाळू व्यक्तीसाठी लिहिले आहेजी कधीकाळी माझ्यासारखीच महत्त्वाकांक्षी होतीपण अनिश्चिततेशी झुंज देत होतीस्वतःहून कधीही न मागितलेल्या अपेक्षांचे ओझे वाहत होती आणि ‘आपल्यात खरंच ते सामर्थ्य आहे का?’ हा प्रश्न स्वतःलाच विचारत होतीया पुस्तकातून मी यशाचे कोणतेही ठरावीक सूत्र सांगितलेले नाहीकारण यशाला असे कोणतेही एकच सूत्र नसतेमात्रमाझ्या प्रवासातील सत्य अनुभव आणि आयुष्यभर जपलेली मूल्ये मी मनापासून मांडली आहेतमाझी ही कहाणी एखाद्या वाचकाला त्याचा पुढचा कठीण निर्णय अधिक धैर्याने आणि कमी भीतीने घेण्याची प्रेरणा देऊ शकलीतर या पुस्तकाचा हेतू सफल झालाअसे मी मानेन.”

     पेंग्विन रँडम हाऊस इंडियाचे लीड – पेंग्विन एंटरप्राइझकस्टम पब्लिशिंगअनुज दत्ता म्हणाले, “प्रकाशक म्हणून आम्ही नेहमी अशा कथा शोधत असतोज्या केवळ यशाची गाथा सांगत नाहीततर त्यामागचा खरा प्रवासही उलगडतात. ‘चूजिंग गोल्डबाबत सर्वात विशेष वाटले ते म्हणजे त्यातील प्रामाणिकपणासौरभ यांनी केवळ त्यांच्या यशाविषयी लिहिलेले नाहीतर त्यांच्या आयुष्याला आकार देणारे कठीण निर्णयअपयश आणि आत्मसंशयाचे क्षणही अत्यंत प्रामाणिकपणे मांडले आहेतत्यामुळे हे पुस्तक केवळ व्यवसायाच्या यशाची कहाणी न राहता नेतृत्वजिद्द आणि आत्मविश्वासाचा एक अतिशय वैयक्तिक आणि प्रेरणादायी प्रवास बनतेउद्योजकव्यावसायिक नेते तसेच करिअरच्या कोणत्याही टप्प्यावर असलेल्या प्रत्येक वाचकाला या पुस्तकातील अनुभवांतून नक्कीच प्रेरणा आणि विचारांची नवी दिशा मिळेल.”

    ‘चूजिंग गोल्ड‘ हे डॉसौरभ गाडगीळ यांनी त्यांच्या आयुष्यातील निर्णयअनुभव आणि शिकवणींचा प्रामाणिक लेखाजोखा म्हणून लिहिले आहेहे पुस्तक केवळ दागिन्यांच्या व्यवसायाशी संबंधित वाचकांसाठी मर्यादित नसूनवारशाची जबाबदारी पेलणाऱ्या व्यक्तीस्वतःच्या बळावर यशस्वी वाटचाल घडवणारे उद्योजक तसेच करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर आत्मसंशयाशी सामना करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरेल.

     या पुस्तकाचा औपचारिक प्रकाशन सोहळा ६ ऑगस्ट रोजी मुंबई येथे खासगी समारंभात पार पडणार पडलात्यावेळी डॉसौरभ गाडगीळ यांच्यासोबत अभिनेत्री माधुरी दीक्षित विशेष संवाद साधला. या संवादातून ‘चूजिंग गोल्ड‘ या पुस्तकामागील प्रेरणादायी प्रवासअनुभव आणि त्यातून मिळालेल्या शिकवणीवर प्रकाश टाकला गेला.

     ‘चूजिंग गोल्ड‘ हे पुस्तक भारतातील सर्व पीएनजी ज्वेलर्सच्या शोरूममध्ये तसेच pngjewellers.com वर उपलब्ध असून, Amazon वर प्रीऑर्डरसाठी खुले आहे३१ ऑगस्ट २०२६ पासून हे पुस्तक देशभरातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध होईलतसेचयाची Kindle आवृत्ती देखील लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In प्रकाशन
Comments are closed.

Check Also

शिवाजी विद्यापीठाच्या आठ विद्यार्थ्यांची सांख्यिकी अधिकारी पदावर निवड

शिवाजी विद्यापीठाच्या आठ विद्यार्थ्यांची सांख्यिकी अधिकारी पदावर निवड कोल्हापूर, : महाराष्…