no images were found
केंद्राकडे थकलेले जीएसटीचे २ हजार कोटी आले; देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली : केंद्र सरकारने राज्य सरकारचे जीएसटीचे २ हजार कोटी रिलिज केले आहेत. ही महाराष्ट्रासाठी महत्त्वाची बाब असून सीएजीने ऑडिट केल्यानंतर तेही १२ ते १३ हजार कोटी रुपये येतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये आहेत. दिल्लीत त्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. यावेळी माध्यमांशी बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,यासोबतच एनडीआरएफचे निकष बदलणं गरजेचं असून ‘सततचा पाऊस’ असा बदल त्यामध्ये करण्याची गरज असल्याचं बैठकीत सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यासह मोठे प्रोजेक्ट उभा करण्यासाठी बँक लोण देत नाही. त्यामुळे धोरणात बदल करण्याचा मुद्दाही त्यांनी बैठकीत मांडल्याचं सांगितलं.
महाविकास आघाडी सरकारने हे जीएसटीचे पैसे मिळावेत, यासाठी वारंवार प्रयत्न केले. परंतु ते मिळत नव्हते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत जाहीरपणे आक्षेप घेतले होते. मात्र आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच हे पैसे मिळाले आहेत.