Home राजकीय मुख्यमंत्री आपल्या आमदार; खासदार; मंत्र्यांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार

मुख्यमंत्री आपल्या आमदार; खासदार; मंत्र्यांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार

0 second read
0
0
33

no images were found

मुख्यमंत्री आपल्या आमदार; खासदार; मंत्र्यांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना घेऊन पुन्हा गुवाहाटी येथे उद्या शनिवारी संध्याकाळी जात आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सर्व आमदार, मंत्री कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. यावेळी पहिल्यांदाच त्यांच्यासोबत शिवसेनेतून फुटलेले १२ खासदारही उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या संध्याकाळी आपल्या आमदार आणि खासदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार आहेत. मुंबईतून विशेष विमानाने सर्वजण गुवाहाटीला जाणार आहेत. मुख्यमंत्री, आमदार आणि खासदार तब्बल तीन महिन्यानंतर गुवाहाटीला जाणार असल्याने मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतरचा एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच गुवाहाटी दौरा आहे. तर शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरचा १२ खासदारांचा हा पहिलाच दौरा आहे. उद्या संध्याकाळी सर्व आमदार, खासदार आणि मंत्री हे सर्वजण रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये उतरणार आहेत. या हॉटेलातील १०० खोल्या बूक करण्यात आल्या आहेत. गेल्यावेळीही याच हॉटेलात शिंदे गट उतरला होता. त्यामुळे पुन्हा याच हॉटेलात सर्व आमदार आणि खासदार उतरणार आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…