no images were found
डीकेटीई सिव्हीलच्या अदनान महातची ऑस्ट्रेलिया येथील विद्यापीठात रु.९५ लाखच्या शिष्यवृत्तीवर उच्च शिक्षणासाठी निवड
इचलकरंजी (प्रतिनिधी):-. डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींगमधील विद्यार्थी अदनान महात याची ऑस्ट्रेलियातील युनिर्व्हसिटी ऑफ सिडनी येथे मास्टर ऑफ प्रोफेशनल इंजिनिअरींग (सिव्हील इंजिनिअरींग) या पदव्युत्तर (एमएस) अभ्यासक्रमासाठी निवड झाली असून त्याला भारत सरकारकडून रुपये ९५ लाखांची प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती मंजुर झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी जगभरातून अनेक विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे तर भारतातून आय.आय.टी. व एन.आय.टी. चे विद्यार्थ्यांची निवड झाली असून या नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा सहभाग हा कौतुकास्पद आहे.
१८५० साली स्थापन झालेले युनिर्व्हसिटी ऑफ सिडनी हे ऑस्ट्रेलियातील सर्वात जुने आणि जागतिक कीर्तीचे विद्यापीठ असून, क्युएस वर्ड रँकिंगमध्ये या विद्यापीठाचा जगात १८ वा क्रमांक आहे. अशा मानांकित विद्यापीठात प्रवेश मिळवून अदनान याने डीकेटीईच्या नावलौकिकात आणखीन भर घातली आहे. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन क्षमता, प्रकल्प, व्यक्तीमत्व आणि मुलाखतीच्या आधारे निवड केली जाते. डीकेटीईमध्ये उपलब्ध आधुनिक प्रयोगशाळा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधनाला पोषक वातावरण आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश मिळाल्याची भावना अदनान यांनी व्यक्त केली.
संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाशआण्णा आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त यांनी विद्यार्थ्यांस शुभेच्छा दिल्या तर संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस.आडमुठे,विभागप्रमुख डॉ एस.के.पाटील व सिव्हील विभागातील सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.