Home Uncategorized प्लास्टिक वापर व अस्वच्छतेविरोधात महापालिकेची धडक कारवाई:

प्लास्टिक वापर व अस्वच्छतेविरोधात महापालिकेची धडक कारवाई:

32 second read
0
0
4

no images were found

प्लास्टिक वापर  अस्वच्छतेविरोधात महापालिकेची धडक कारवाई: नऊ व्यावसायिकांकडून अकरा हजार चारशे रुपयांचा दंड वसूल

कोल्हापूर,  : शहरातील स्वच्छतेस बाधा आणणाऱ्या, रस्तेवर थुंकणारा आणि बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिक व नागरिकांविरोधात कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. आज लक्ष्मीपुरी, सोमवार पेठ आणि गंजी गल्ली परिसरात या विशेष उपद्रव शोम पथकाद्वारे मोहीम राबविण्यात आली.

            या कारवाईत अल-अरोमा बेकरी, नागनाथ भिसे, सरताज मलिक, शंकर चौरागे, अभिजीत पिसाळ किराणा स्टोअर, अशोक दवंडी, वासिम मनेर, शाहिद बागवान आणि वहिम बागवान यांच्यावर बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर केल्याप्रकरणी एकूण ११ हजार ४०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार उपद्रव शोध पथकाने ही कारवाई केली. महापालिकेच्या या पथकाने गेल्या १५ दिवसांपासून शहरात जनजागृती मोहीम राबवून नागरिक आणि व्यावसायिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचे तसेच शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे.

            आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागाने नागरिक, व्यावसायिक आणि विक्रेत्यांना दैनंदिन कचरा केवळ महापालिकेच्या अधिकृत घंटागाडीमध्येच देण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक रस्त्यावर थुंकणे, उघड्यावर कचरा जाळणे किंवा कचरा रस्त्यावर अथवा नाल्यात टाकणे टाळावे, अन्यथा संबंधितांवर महाराष्ट्र प्लास्टिक व घनकचरा व्यवस्थापनासंदर्भातील लागू नियम आणि नियंत्रण अधिनियम, १९९८ मधील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई किंवा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

महाराष्ट्रातील कॅन्सरचा वाढता धोका लक्षात घेता, स्टार हेल्थने कोल्हापूरच्या ॲडव्हायझर्सना कॅन्सर केअरचे ट्रेनिंग दिले

महाराष्ट्रातील कॅन्सरचा वाढता धोका लक्षात घेता, स्टार ह…