Home बँकिंग विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एचडीएफसी बँकेच्या सीएसआरचे अस्तित्व  १०.७७ कोटी लोकांपर्यत पोहोचले

विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एचडीएफसी बँकेच्या सीएसआरचे अस्तित्व  १०.७७ कोटी लोकांपर्यत पोहोचले

19 second read
0
0
6

no images were found

विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एचडीएफसी बँकेच्या सीएसआरचे अस्तित्व  १०.७७ कोटी लोकांपर्यत पोहोचले

मुंबई, :  एचडीएफसी बँक या भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वांत मोठ्या बँकेच्या सीएसआर उपक्रमामुळे १०.७७ कोटी लोकांवर परिणाम झाला आहे.  परिवर्तन हा त्यांचा सीएसआर उपक्रमांचा ब्रॅन्ड असून हा ब्रॅन्ड आता भारतातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोहोचला आहे.  बँक सध्या एनजीओ पार्टनर्स, स्थानिक प्रशासन आणि सामाजिक संस्था बरोबर काम करुन स्थानिक स्तरावरील गरजेच्या, दीर्घकालीन शाश्वत परिणाम घडवण्यासाठी योग्य पध्दतीने सहकार्य करत आहे.

बँके तर्फे ही घोषणा करण्यात आली की त्यांच्या कॉर्पोरेट़ सामाजिक जबाबदारी (सीएसआर) उपक्रमा अंतर्गत त्यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये रु १,३१६.१८ कोटी रुपये खर्च केले असून याची घोषणा या वर्षीच्या एकत्रित वार्षिक अहवालात त्यांनी केली आहे.  गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ रु २४८ कोटींची असून सर्वसमावेशक सीएसआर मधील गुंतवणूक त्यांच्या परिवर्तन या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून त्यांनी अंदाजे ७,४९२ कोटी रुपयांची आहे.

बँकेच्या होलिस्टिक रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम (एचआरडीपी) ची प्रगती होऊन वर्षभरापूर्वी १०,४३० गावां वरुन देशातील ११००० गावांमध्ये पोहोच गेली आहे.  जल-व्यवस्थापन, कृषी, उपजीविका, शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता आणि सामुदायिक पायाभूत सुविधा यांचा समावेश असलेल्या एकात्मिक दृष्टिकोनाद्वारे, हा कार्यक्रम ग्रामीण भागांना अधिक बळकट करण्यासोबतच लोकांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य अविरतपणे करत आहे. या कार्यक्रमाच्या कार्यक्षेत्रात ग्रामीण विद्युतीकरण, उपजीविकेतील सुधारणा आणि कृषी, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील मूलभूत पायाभूत सुविधांचा विकास यांसारख्या बाबींचा समावेश आहे.

एचडीएफसी बँकेचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर श्री. कैझाद भरुचा यांनी सांगितले “ परिवर्तनच्या माध्यमातून आमचे CSR उपक्रम या विश्वासाने सातत्याने मार्गदर्शन घेत आहेत की, शाश्वत बदल हा गावागावातून, कुटुंबागणिक आणि आम्ही ज्या समुदायांची सेवा करतो त्यांच्याशी घनिष्ठ भागीदारीतून घडवला जातो. यावर्षी, सर्वसमावेशक ग्रामीण विकास कार्यक्रम अधिक सखोल करण्यासाठी आणि सीमावर्ती गावांपर्यंत आमची पोहोच वाढवण्यासाठी केलेले आमचे प्रयत्न, कोणताही समुदाय विकासाच्या प्रवाहापासून वंचित राहू नये, या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहेत. पुढील वाटचालीकडे पाहताना, सुरुवातीपासून आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या त्याच तत्त्वज्ञानासह हा प्रवास अधिक बळकट करण्यावर आमचे लक्ष कायम राहील — विकास हा सर्वसमावेशक, स्थानिक गरजांशी सुसंगत आणि भविष्याभिमुख असला पाहिजे.”

परिवर्तन काम करत असलेली क्षेत्रे

बँकेचा परिवर्तन उपक्रम हा सहा विशिष्ट क्षेत्रांवर लक्ष्य ठेऊन काम करत आहे –

  • ग्रामीण विकास : बँकेच्या महत्त्वपूर्ण अशा सीएसआर उपक्रम दि होलिस्टिक रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम (एचआरडीपी) कडून सर्वसमावेशक, क्लस्टरवर आधारीत दृष्टिकोन ठेवला जात असून ग्रामीण भायाभूत सुविधा, नैसर्गिक घटकांचे व्यवस्थापन, आरोग्य आणि स्वच्छता यांचा समावेश आहे. एचआरडीपी चे कार्य आता ११००० हून अधिक गावात पोहोचले असून बँकेची पोहोच ही सीमाभागातील ४९८ गावांपर्यंत गेली आहे.
  • शिक्षणाचा प्रसार : या विभागाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणात सुधारणा ही शिष्यवृत्ती, शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि डिजिटल लर्निंग सुविधां मध्ये बदल करण्यात येत आहे.  एचडीएफसी बँके कडून ३६३०० हून अधिक शिष्यवृत्त्या, ३४६० हून अधिक स्मार्ट स्कूल्सची स्थापना आणि ९३० सामाजिक वाचनालयांची निर्मिती करण्यात आली आहे.
  • कौशल्य प्रशिक्षण आणि जीवन सुधारणा : बँके तर्फे तरुण, महिला आणि व्यक्तींना रोजगाराक्षम प्रशिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांना सुरक्षित जीवनव्यापनात सहकार्य केले जाते, ज्यामुळे ते शाश्वत जीवन व्यापन करुन शकतील. आजमितीस बँकेने ९.६ लाख लोकांपर्यंत ही योजना पोहोचवली आहे.
  • आरोग्य आणि स्वच्छता : हा विभाग प्रतिबंधात्मक काळजी, माता आणि बालकांचे आरोग्य आणि स्वच्छते विषयी जागरुकता त्यांच्या मोबाईल क्लिनिक्स आणि सामाजिक उपक्रमांतून कार्य करतो. या उपक्रमाचा ३ लाखांहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे.
  • वित्तीय साक्षरता आणि समावेशन : या विभागाअंतर्गत बँके कडून लोकांना वित्तीय जागरुकता, बचतीचे महत्त्व आणि बँकिंग आणि विमा सेवां विषयी जागरुकता निर्माण केली जाते. त्यांच्या व्हिजिल आंटी या डिजिटल फ्रॉड अवेअरनेस मोहिमेच्या माध्यमातून या मंचाशी ७५ लाखांहून अधिक फॉलोअर्स जोडण्यात आले आहेत.
  • नैसर्गिक घटकांचे व्यवस्थापन : या विभागाच्या माध्यमातून पाणी बचत, वनीकरण, सौर उपाय आणि जैवविविधतेचे व्यवस्थापन यावर लक्ष्य दिले जाते. एचडीएफसी बँके तर्फे आजपर्यंत १६,०९१ हून अधिक पाणी वाचवण्याच्या सुविधांची निर्मिती करुन ८०,५२७ हून अधिक सौर दिवे बसवण्यात आले आहेत.

युनाटेड नेशन्स द्वारे १७ शाश्वत विकास लक्ष्यांपैकी १० वर लक्ष दिल्याने या सहा विभागांच्या माध्यातून असे दिसून येते की एचडीएफसी बँकेच्या एकात्मिक दृष्टिकोना सह शाश्वत विकासाला चालना मिळत आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In बँकिंग
Comments are closed.

Check Also

टाटा सॉल्ट खात्रीशीर शुद्धता आणि गुणवत्ता मानकांसह आयोडीन पोषणामध्ये अग्रस्थानी

टाटा सॉल्ट खात्रीशीर शुद्धता आणि गुणवत्ता मानकांसह आयोडीन पोषणामध्ये अग्रस्थानी  टाटा…