Home उद्योग अदाणी  टोटल गॅसचे आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल

अदाणी  टोटल गॅसचे आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल

15 second read
0
0
30

no images were found

अदाणी  टोटल गॅसचे आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल

एटीजीएलने आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीमध्ये महसूल आणि विक्रीत दमदार वाढ नोंदवली

  • आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाही मध्ये कंपनीच्या महसुलात वर्षागणिक 27% वाढ होऊन तो 1,910 कोटीं रुपयांवर पोहोचला. गॅस विक्रीचे प्रमाण 13% वाढून 303 एमएमएससीएम झाले.
  • सीएनजी स्टेशनचे नेटवर्क वाढून 707 स्टेशनपर्यंत पोहोचले.
  • पीएनजी घरगुती कनेक्शन्स सुमारे 11.41 लाख घरांपर्यंत पोहोचले.
  • इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) चार्जिंग पॉइंट्सची संख्या वाढून 5,306 झाली.
  • पर्यावरण, सामाजिक जबाबदारी आणि सुशासन (ईएसजी) क्षेत्रातील कंपनीच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळाले असून केअरएज आणि क्रिसिल यांनी कंपनीच्या ईएसजी रेटिंगमध्ये सुधारणा केली आहे.

अहमदाबाद, : भारतातील आघाडीच्या सिटी गॅस वितरण (CGD) कंपन्यांपैकी एक असलेल्या अदाणी  टोटल गॅस लिमिटेड (ATGL) ने विद्यमान आणि नव्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये (GA) मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विस्तार, गॅस विक्रीतील वाढ आणि स्वच्छ ऊर्जा व्यवसायाच्या माध्यमातून देशाच्या ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. कंपनीने आज 30 जून 2026 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीतील आणि आर्थिक वर्षातील कार्यप्रदर्शन, पायाभूत सुविधा विस्तार आणि आर्थिक निकाल जाहीर केले.

एटीजीएलचे सीईओ संजय पंडिता म्हणाले आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीमध्ये एटीजीएलने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत गॅस विक्रीच्या प्रमाणात (व्हॉल्यूम) मागील वर्षाच्या तुलनेत 13 टक्के आणि महसुलात 27 टक्के वाढ नोंदवली आहे. स्वच्छ इंधनांना ग्राहकांकडून वाढता प्रतिसाद आणि कंपनीच्या मजबूत कार्यक्षमतेमुळे ही वाढ शक्य झाली आहे.

या कालावधीत जागतिक स्तरावर नैसर्गिक गॅसच्या वाढलेल्या किमती, ब्रेंट क्रूडचे वाढते दर, चलनातील चढ-उतार आणि भू-राजकीय घडामोडींमुळे ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला. या आव्हानांमुळे सिटी गॅस वितरण उद्योगाच्या गॅस खरेदी आणि पुरवठा धोरणावर दबाव आला. तरीही आम्ही गॅसचा अखंड पुरवठा, कार्यक्षमतेत सातत्याने सुधारणा, सीएनजी आणि पीएनजी ग्राहकांना अनावश्यक जोखमीपासून सुरक्षित ठेवणे तसेच ग्राहक आणि भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्यावर भर दिला. आम्ही शाश्वत विकासावर सातत्याने लक्ष केंद्रित करत आहोत. यासाठी नियोजनबद्ध नेटवर्क विस्तार, डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि सीएनजी, पीएनजी तसेच ई-मोबिलिटी क्षेत्रातील स्वच्छ ऊर्जा परिसंस्थेचा विकास यावर भर देत आहोत.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली

शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली : आमदार राजेश क्षीरसागर य…