Home उद्योग एपीएसईझेड मुंद्रा पोर्ट आणि एसईझेड मध्ये स्वतंत्र रिकामे कंटेनर यार्डचे कामकाज सुरू करणार

एपीएसईझेड मुंद्रा पोर्ट आणि एसईझेड मध्ये स्वतंत्र रिकामे कंटेनर यार्डचे कामकाज सुरू करणार

18 second read
0
0
6

no images were found

एपीएसईझेड मुंद्रा पोर्ट आणि एसईझेड मध्ये स्वतंत्र रिकामे कंटेनर यार्डचे कामकाज सुरू करणार

अहमदाबाद : भारतातील सर्वात मोठी एकात्मिक वाहतूक सेवा देणारी कंपनी अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (एपीएसईझेड) चा आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतातील कंटेनर बाजारात 45.5 टक्के वाटा आहे. यामध्ये मुंद्रा पोर्टचा एकट्याचा वाटा जवळपास 35 टक्के आहे. त्यामुळे मुंद्रा हे भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणारे बंदर ठरले आहे. मुंद्रा बंदरावर दरवर्षी सुमारे 16 लाख टीईयू रिकामे कंटेनर हाताळले जातात. यावरून भारताच्या आयात-निर्यात पुरवठा साखळीला मदत करण्यात मुंद्रा पोर्टची महत्त्वाची भूमिका स्पष्ट होते.

एपीएसईझेड च्या ‘अॅम्बिशन 2031’ योजनेअंतर्गत कंपनी आपल्या विविध बंदरांवरील क्षमता वाढवण्यासाठी मोठी गुंतवणूक करत आहे. यामध्ये मुंद्रा बंदराला विशेष महत्त्व दिले जात आहे. पुढील पाच वर्षांत कंपनी 60 लाखांहून अधिक टीईयू कंटेनर हाताळणी क्षमता वाढवण्याची योजना आखत आहे. या योजनेचा एक भाग म्हणून एपीएसईझेड मुंद्रा येथे स्वतंत्र रिकामे कंटेनर यार्ड (एम्प्टी कंटेनर यार्ड- ECY) सुरू करणार आहे. या यार्डमध्ये गोदामाची सुविधाही असेल. या यार्डमध्ये रिकाम्या कंटेनरशी संबंधित सर्व सेवा एकाच ठिकाणी दिल्या जातील. यामध्ये कंटेनर साठवणूक, देखभाल, तपासणी तसेच निर्यातदार आणि सीएफएसपर्यंत कंटेनर पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध असेल.

एपीएसईझेडचे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अश्वनी गुप्ता म्हणाले, मुंद्रा येथे एपीएसईझेड आणि/किंवा त्यांचे भागीदार (यामध्ये सीएफएस आणि शिपिंग कंपन्यांचा समावेश आहे) स्वतंत्र रिकामे कंटेनर यार्ड चालवणार आहेत. यामुळे कंटेनरशी संबंधित संपूर्ण व्यवस्थेत काम अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने होईल. कंटेनरची ये-जा जलद होईल, अनावश्यक कंटेनर वाहतूक कमी होईल आणि लॉजिस्टिक खर्चात बचत होईल. व्यापाराला मदत करणाऱ्या पायाभूत सुविधा मजबूत करणे हे भारताच्या विकासाला आणि ‘विकसित भारत’च्या उद्दिष्टाला पाठिंबा देण्याच्या एपीएसईझेडच्या वचनबद्धतेचा महत्त्वाचा भाग आहे.”

या उपक्रमामुळे सरकारच्या कार्यक्षम आणि तंत्रज्ञानावर आधारित लॉजिस्टिक व्यवस्था विकसित करण्याच्या तसेच व्यवसाय करणे अधिक सोपे करण्याच्या प्रयत्नांना मदत होणार आहे. मुंद्रा पोर्ट एसईझेडच्या परिसरातच रिकाम्या कंटेनरचे कामकाज सुरू केल्यामुळे कस्टम्स अधिकारी, शिपिंग कंपन्या, टर्मिनल ऑपरेटर आणि वाहतूकदार यांच्यात अधिक चांगला समन्वय साधता येईल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

पूर, भूस्खलन सौम्यीकरणाच्या कामांना प्राधान्य द्यावे    -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

पूर, भूस्खलन सौम्यीकरणाच्या कामांना प्राधान्य द्यावे    -जिल्हाधिकारी डॉ. विजय र…