no images were found
अदाणी एनर्जी सोल्युशन्सला जागतिक स्तरावर सर्वोच्च ईएसजी स्कोअर; युटिलिटीज क्षेत्रात अव्वल स्थान
अहमदाबाद, : अदाणी एनर्जी सोल्युशन्स (एईएसएल),भारतातील सर्वात मोठी खासगी ट्रान्समिशन आणि वितरण कंपनी,यांनी आज सांगितले की,एस अँड पी ग्लोबल च्या नवीनतम मीडिया अँड स्टेकहोल्डर ऍनालिसिस(एमएसए) पुनरावलोकनानंतर,यूटिलिटीज क्षेत्रात जागतिक स्तरावर सर्वाधिक ईएसजी-स्कोअर मिळवणारी कंपनी म्हणून तिने विशेष स्थान प्राप्त केले आहे.
या पुनरावलोकनानंतर,पूर्वी प्रभावित झालेल्या गव्हर्नन्स-संबंधित मूल्यांकनात दुरुस्ती करण्यात आली,ज्यामुळे कंपनीच्या ईएसजी स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली.परिणामी,एईएसएल ने 100 पैकी 90 ईएसजी स्कोअर प्राप्त केला असून, 41 च्या उद्योग सरासरीच्या तुलनेत ती जागतिक युटिलिटीज क्षेत्रात अव्वल स्थानावर पोहोचली आहे. या पुनरावलोकनापूर्वी एईएसएल चा स्कोअर 81 होता. कंपनीच्या प्रकटीकरणावर आधारित कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंट (सीएसए) स्कोअरमध्येही वर्ष-दर-वर्ष 17 अंकांची वाढ होऊन तो 90 वर पोहोचला आहे.
एईएसएल ची कामगिरी ईएसजी च्या तिन्ही आयामांमध्ये मजबूत परिणाम दर्शवते. पर्यावरणीय (एन्व्हायरमेंटल) स्कोअर 93, सामाजिक (सोशल) स्कोअर 89 आणि गव्हर्नन्स व आर्थिक (गव्हर्नन्स अँड इकॉनॉमिक) स्कोअर 84 असून, हे सर्व उद्योगाच्या सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक आहेत. एईएसएल च्या कामगिरीमागील प्रमुख घटकांमध्ये प्रोडक्ट स्टीवर्डशिप,क्लायमेट स्ट्रॅटेजी आणि ह्यूमन कॅपिटल मॅनेजमेंट यांचा समावेश आहे.
“एईएसएल ला एस अँड पी ग्लोबल कडून जागतिक स्तरावर सर्वाधिक ईएसजी-स्कोअर प्राप्त युटिलिटी कंपनी म्हणून मान्यता मिळणे हा आमच्यासाठी अभिमानाचा टप्पा आहे आणि शाश्वत विकासासाठी आमच्या वचनबद्धतेची भक्कम पुष्टी आहे. एईएसएल मध्ये शाश्वतता ही आमच्या दैनंदिन निर्णयप्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे. पर्यावरणीय कामगिरी, सामाजिक परिणाम, गव्हर्नन्सचे मानदंड आणि प्रकटीकरण पद्धती अधिक सक्षम करण्यासाठी आमच्या संस्थेतील सर्व टीम्स सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांचे हे यश प्रतिबिंब आहे,” असे एईएसएल चे सीईओ श्री.कंदर्प पटेल यांनी सांगितले.