Home मनोरंजन वागले की दुनिया’ मध्ये अथर्वच्या टीकेनंतर राजेश बेपर्वाईने निर्णय घेत सुटतो..

वागले की दुनिया’ मध्ये अथर्वच्या टीकेनंतर राजेश बेपर्वाईने निर्णय घेत सुटतो..

6 second read
0
0
77

no images were found

वागले की दुनिया’ मध्ये अथर्वच्या टीकेनंतर राजेश बेपर्वाईने निर्णय घेत सुटतो..

 

सोनी सबवरील ‘वागले की दुनिया- नई पिढी नए किस्से’ मालिकेत वागळे कुटुंबातील दैनंदिन संघर्ष आणि त्यावरील विजयाचे वर्णन दर्शवले जाते. नुकत्याच झालेल्या भागात, अथर्व (शीहान कपाही) त्याचे वडील राजेश (सुमित राघवन) याला टोमणा मारतो. आयुष्यात सशासारखे धावण्याऐवजी त्याची गती कासवासारखी आहे, असे म्हणतो. नेहमी मध्यमवर्गीय स्टेटसचे समर्थन आणि फार महत्त्वाकांक्षी नसल्यावरून टीका करतो.

पुढील भागात, राजेश या टीकेमुळे एकच ध्यास घेत. सतत कासव आणि सशाची तुलना करतो. मुलाच्या टोमण्यामुळे तो अनावश्यक रिस्क घ्यायला सुरुवात करतो. बेपर्वाईने गाडी चालवतो, वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे पोलीस स्टेशनला जावे लागते. तर वंदनाचे दागिने गहाण टाकून शेअर मार्केटमध्येही गुंतवणूक करतो. राजेश साधेपणाच्या सर्व मर्यादा ओलांडतो. लॉटरीची तिकिटे खरेदी करतो आणि आणखी पैसे गमावतो. आयुष्यात आपणही जिंकू शकतो, हे सिद्ध करण्याचा निश्चय केल्यामुळे राजेश खूप अविवेकी निर्णय घेतो. यामुळे संपूर्ण कुटुंब विशेषत: वंदना काळजीत पडते. राजेश आणखी रिस्क घेतो, तेव्हा वंदनाशी वाद होतात. या आदर्श जोडप्यासमोर नवे आव्हान उभे राहते. राजेशच्या या वागण्याचा कुटुंबावर काय परिणाम होईल? त्याच्या या उलट-सुलट जोखीमांचे परिणाम काय होतील?

राजेश वागळेची भूमिका साकारणारा सुमित राघवन म्हणाला,“राजेशची ही वेगळी बाजू पाहिल्यानंतर प्रेक्षकांना धक्कास बसेल. जो माणूस हातात माचिस घ्यायला घाबरत होता, तो हातात दिवा धरून पेटवतो. ज्याने कधी ट्रॅफिक सिग्नलचे नियम मोडले नाही, तो बेपर्वाईने गाडी चालवण्यामुळे पोलिस स्टेशनमध्ये जातो. त्यामुळे राजेश हा खऱ्या राजेशप्रमाणे वागत नाही, हे स्पष्ट आहे. आता प्रश्न  आहे की, राजेशचे असे वागणे कधी थांबेल? त्याच्या अशा जोखीम घेण्यामुळे वागळे कुटुंबावर काय परिणाम होतील?

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…