Home उद्योग देहातच्या ‘फ्रेशट्रॉप आभार योजने’ला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ५१ आकर्षक बक्षिसांचे वितरण

देहातच्या ‘फ्रेशट्रॉप आभार योजने’ला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ५१ आकर्षक बक्षिसांचे वितरण

2 second read
0
0
8

no images were found

देहातच्या ‘फ्रेशट्रॉप आभार योजने’ला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ५१ आकर्षक बक्षिसांचे वितरण

सांगली (प्रतिनिधी):- देशातील आघाडीची ॲग्रीटेक कंपनी देहातच्या फ्रेशट्रॉप या निर्यात विभागातर्फे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी  आलेल्या ‘फ्रेशट्रॉप आभार योजने’चा बक्षीस वितरण सोहळ्याने यशस्वी समारोप झाला. नाशिक आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने आपला द्राक्षमाल फ्रेशट्रॉपला विकून लकी ड्रॉमध्ये सहभाग नोंदविला.
या योजनेअंतर्गत एक ट्रॅक्टर, तीन मोटारसायकली, पाच टीव्हींसह एकूण ५१ आकर्षक बक्षिसांचे वितरण विजेत्या शेतकऱ्यांना करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील ज्ञानदेव दगु मांजरे यांनी प्रथम क्रमांकाचे ट्रॅक्टर हे बक्षीस जिंकले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांशी अधिक दृढ नातेसंबंध निर्माण करणे आणि त्यांच्या मेहनतीचा सन्मान करणे हा होता.
यावेळी देहातचे मुख्य व्यवसाय अधिकारी रोहित सरीन म्हणाले, “फ्रेशट्रॉप आभार योजनेत शेतकऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतल्याचा आम्हाला आनंद आहे. शेतकऱ्यांचा हा प्रतिसाद केवळ या योजनेच्या यशाचे प्रतीक नाही, तर फ्रेशट्रॉपवरील त्यांचा विश्वास आणि अनेक वर्षांपासून जपलेले मजबूत नातेही दर्शवतो. भविष्यातही आम्ही शेतकरी-केंद्रित विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
देहातकडून गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी हिताच्या विविध योजना राबविण्यात येत असून, त्याला शेतकऱ्यांकडून सातत्याने सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ‘फ्रेशट्रॉप आभार योजना’च्या अभूतपूर्व यशामुळे शेतकरी आणि फ्रेशट्रॉप यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक बळकट झाल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

रत्नागिरी मान्सून आरोग्य सल्ला : स्टार हेल्थकडून ताप, डेंग्यू आणि मलेरियाच्या प्रादुर्भावाबाबत इशारा;

रत्नागिरी मान्सून आरोग्य सल्ला : स्टार हेल्थकडून ताप, डेंग्यू आणि मलेर…