
no images were found
‘आधारतीर्थ’ आश्रमात चार वर्षीय बालकाचा खून
नाशिक : राज्यातील आधारतीर्थ आश्रम हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले आणि गरीब कुटुंबातील मुलांकरिता असलेले एक केंद्र आहे. सध्या या आश्रमाबद्दल अनेक तक्रारी पोलीसांकडे आल्या होत्या. या आश्रमातील मुलांना त्रास देण्यात येतो अश्याप्रकारची माहिती तपासादरम्यान पोलीसांसमोर येत आहे.
नाशिक येथील त्र्यंबकेश्वर रोडवर असलेल्या आधारतीर्थ आश्रमात अलोक विशाल शिंगारे (वय ४ वर्षे) या बालकाचा खून झाला आहे. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक वाय. एस. खैरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अधिक तपास सुरु आहे.
अलोक शिंगारे (वय ४ वर्षे) या बालक आश्रमात सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टरच्या बाजूला पडलेल्या अवस्थेत आढळला. तातडीने आश्रमातील कर्मचाऱ्यांनी अलोक याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु अलोक डॉक्टरनी मृत घोषित केले. अलोकच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्याने शवविच्छेदन करण्यात आले असून त्यामध्ये अलोकचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याच आश्रमात अलोमचा भाऊदेखील असल्याचे समजते. अलोकचे मुलांसोबत भांडण झाल्याने त्यामधून हा प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गुन्ह्याच्या तपासांतर्गत महिला बाल कल्याण विभागाच्या मदतीने मनोसपचार तज्ज्ञांच्या मदतीने समुपदेशन करून खुनाचा शोध घेतला जाईल.