no images were found
महापालिकेच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांना अभिवादन
कोल्हापूर (प्रतिनिधी ):- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५2 व्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज लक्ष्मी विलास पॅलेस (कसबा बावडा) येथील जन्मस्थळातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस, दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांचे पूर्णाकृती पुतळ्यास, सिद्धार्थनगर येथील नर्सरी बागेतील शाहू समाधी स्थळी व कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहातील राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांचे अर्धपुतळयास महापौर सौ.रुपाराणी निकम व आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.
यावेळी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, अमल महाडीक, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.के.कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जॅस्मिन, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, उप-महापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती शिराळे, महिला बालकल्याण समिती सभापती सौ. कौसर बागवाण, उपसभापती सौ. दिपा ठाणेकर, सभाग्रहनेता मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, गटनेते इंद्रजित बोंद्रे, आदील फरास, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे, विजय पाटील,राम काटकर, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य लेखापरिकक्षक कलावती मिसाळ, रवका अधिकारी प्रशांत पंडत, उप-शहर अभियंता सुरेश पाटील, नगरसेवक प्रविण केसरकर, विजयसिंह खाडे-पाटील, सुभाष बुचडे, सचिन चौगुले, विनायक कारंडे, अश्किन आजरेकर, नगरसेविका सौ.पुष्पा नरुटे, सौ. रुपाली पोवार, उप-शहर अभियंता सुरेश पाटील, निवास पोवार, नगरसचिव सुनिल बिद्रे, माजी नगरसेवक अजित पोवार, सागर यवलूजे,अजित ठाणेकर, अशोक जाधव, शाहू प्रेमी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.