
no images were found
सारथीमार्फत विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) मार्फत जाहीर करण्यात आलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज अद्याप भरले नाहीत त्यांनी ते विहीत मुदतीत भरावेत व ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) उपकेंद्राचे सहव्यवस्थापकीय संचालकांनी केले आहे.
अर्जाच्या प्रती आवश्यक त्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतींसहित छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे, बालचित्रवाणी आगरकर रोड, शिवाजी नगर, पुणे 411004 पत्त्यावर दि. 30 नोव्हेंबरपर्यंत पोस्टाव्दारे पाठवावेत.
डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्तीसाठी दिनांक 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज पाठवावेत. एमपीएससी मेन्स स्कॉलरशिपचे अर्ज दिनांक 28 नोव्हेंबर 2022 पर्यंत भरावेत व दिनांक 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत पाठवोत. परिविक्षाधीन अधिकारी, लिपिक आयबीपीएस बँकिंगचे अर्ज दिनांक 31 डिसेंबर 2022 पर्यंत पाठवावेत. एमपीएससी (सीजेजेडी आणि जेएमएफसी) चे अर्ज दिनांक 28 नोव्हेंबर 2022 पर्यंत भरावेत व दिनांक 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत पाठवावेत.