
no images were found
दिल दिया गल्लांमध्ये प्रमुख भूमिका साकारण्यासाठी संदीप बसवानाची निवड
टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेता संदीप बसवानाची सोनी सबवरील नवीन मालिका ‘दिल दिया गल्लां’साठी निवड करण्यात आली आहे. तो या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारताना पाहायला मिळेल.
संदीप बसवाना ‘मनदीप’ची भूमिका साकारणार आहे, जो अमृताचा (कावेरी प्रियम) वडिल आणि दिलप्रीतचा (पंकज बेरी) मुलगा आहे. मनदीप कथानकावर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख पात्रांपैकी एक आहे. आपली ध्येये संपादित करण्यासोबत स्वावलंबी, श्रीमंत व अभिमानी व्यक्ती बनला असताना देखील त्याला त्याच्या वडिलांच्या वर्चस्वाखाली असल्यासारखे वाटते. आपल्या पालकांच्या इच्छा नाकारत तो गर्व व अहंकारासह स्वत:च जीवनात निर्णय घेतो, ज्यामुळे कुटुंबामध्ये कलह निर्माण होतो.
संदीप या नवीन भूमिकेबाबत सांगताना म्हणाला, “मनदीपची भूमिका आपल्या महत्त्वाकांक्षा व ध्येये संपादित करण्याची इच्छा असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील कोणत्याही मुलासारखी आहे. कथानक पाहता ही भूमिका आव्हानात्मक आहे. मनदीपचा एक निर्णय कुटुंबाचे नशीब ठरवते. पण काही व्यक्तींनाच चर्चा करत विवादांचे निराकरण करण्याचे महत्त्व समजते, तर अनेकजण काहीच बोलत नाहीत, जयामुळे त्यांच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. मी ही भूमिका साकारण्यास खूप उत्सक आहे. ही भूमिका मी यापूर्वी साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आहे.’’
संदीपची भूमिका अत्यंत आव्हानात्मक आहे आणि प्रेक्षकांना कथानकाकडे पाहण्याचा अद्वितीय दृष्टिकोन देते.