Home Uncategorized उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर घातपात करण्याचा निनामी फोन

उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर घातपात करण्याचा निनामी फोन

0 second read
0
0
24

no images were found

उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर घातपात करण्याचा निनामी फोन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचा फोन तामिळनाडू पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला आहे. या फोननंतर मुंबई पोलीस आणि मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या ४ ते ५ मुस्लीम व्यक्तींचे संभाषण ऐकून नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली आहे. हे मुस्लीम तरुण उर्दूतून हे संभाषण करत असल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली आहे.

तरुण मोहम्मद अली रोड येथे रुम रेंटवर घेणार असल्याचे नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीन सांगितलं आहे. या माहितीनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून कसून तपास करत आहेत.

तामिळनाडू पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मुंबईत बॉम्ब ठेवल्याचा धमकी वजा फोन आला आहे. मुंबईत बाॅम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्यानंतर तामिळनाडू पोलिसांनी मुंबई पोलीस नियंत्रण कक्ष आणि राज्य पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली आहे. या मुंबईत बॉम्ब ठेवल्याच्या धमकीनंतर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…