
no images were found
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं एक लोकसभेची जागा जिंकून दाखवावी”, गिरीश महाजन
महायुतीचे समन्वय मेळावे रविवारी महाराष्ट्रात पार पडले. जळगावात झालेल्या समन्वय मेळाव्यात मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं महाराष्ट्रात लोकसभेची एक जागा निवडून दाखवावी, असं गिरीश महाजनांनी म्हटलं आहे.
गिरीश महाजन म्हणाले, “महाराष्ट्रातील ४८ लोकसभेच्या जागा महायुती जिंकणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं लोकसभेची एक जागा जिंकून दाखवावी. ठाकरे गटाकडून २५ ते ३० जागांची मागणी करण्यात येत आहे. ठाकरे गटानं २५ जागांवर लढावं किंवा ३ जागांवर लढावं. पण, एका जागेवर निट लक्ष देऊन खासदार निवडून आणून दाखवावा.”