Home गौरव सन्मान डॉ. संजय डी. पाटील यांना राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर

डॉ. संजय डी. पाटील यांना राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर

6 second read
0
0
4

no images were found

डॉ. संजय डी. पाटील यांना राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा
डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर

कोल्हापूर, (प्रतिनिधी) : कृषी, फलोत्पादन, पर्यावरण संवर्धन, शेती आणि शेतकरी विकास आणि कृषी उद्योजकता या क्षेत्रांत गेली अनेक दशके उल्लेखनीय कार्य करणारे डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष आणि डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदेचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. कृषी विकासासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान मानला जातो.

      डॉ. संजय डी. पाटील यांनी आधुनिक शेती, फलोत्पादन, पर्यावरण संवर्धन, शेतकरी मार्गदर्शन, कृषी उद्योजकता आणि ग्रामीण विकास यांचा प्रभावी संगम घडवून अनेक अभिनव उपक्रम राबविले आहेत. तळसंदे येथील फोंड्या माळावर त्यांनी वनराई फुलविली आहे. तळसंदे येथे शेतीतील विविध प्रयोग ते करत असतात. त्याचबरोबर
शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक शेती पद्धती, उत्पादनवाढ आणि मूल्यवर्धन याबाबत मार्गदर्शन करून त्यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती पोचविण्याचे काम ही त्यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना २०२३ सालचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

         ⁶डॉ. पाटील यांच्या क्षेत्रातील कार्याबद्दल यापूर्वी अनेक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. १९९१ मध्ये महाराष्ट्र शासनाचा ‘वनश्री पुरस्कार’, १९९३ मध्ये भारत सरकारचा ‘इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार’, २००१ मध्ये कृषी व ग्रामीण विकासातील योगदानाबद्दल ‘कोल्हापूर भूषण’ हा सन्मान, २०१४ मध्ये महाराष्ट्र शासनाचा ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार’ तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचा ‘बळीराजा पुरस्कार’, २०१९ मध्ये सकाळ ॲग्रोवनचा ‘बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड’ २०२२ मध्ये इंडियन चेंबर ऑफ फूड अँड एग्रीकल्चर, नवी दिल्लीचा ‘इंडिया अॅग्री बिझनेस अवॉर्ड’, २०२३ मध्ये झी मीडिया ग्रुपचा ‘कृषीभूषण अवॉर्ड’, २०२४ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील ‘ॲग्री लीजंड अवॉर्ड’ ने त्यांना सन्मानित करण्यात आले.

कोट

शेती हा सुरुवातीपासून माझ्या आवडीचा विषय आहे. गेल्या अनेक वर्ष शेतीमध्ये विविध प्रयोग करण्याचा प्रयत्न मी सातत्याने करत आलो आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने या सर्व गोष्टींची दखल घेऊन शेतीमधील सर्वोच्च पुरस्कार देऊन माझा गौरव केल्याचा क्षण समाधान आणि आनंद देणारा आहे.
*-डॉ.संजय डी.पाटील*
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In गौरव सन्मान
Comments are closed.

Check Also

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक घेतले श्री अंबाबाई महालक्ष्मीचे दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक घेतले श्री अंबाबाई महालक्ष्मीचे दर्शन मुख्यमंत्र…