Home राजकीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कोल्हापुरात आगमन.   

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कोल्हापुरात आगमन.   

10 second read
0
0
8

no images were found

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कोल्हापुरात आगमन.            कोल्हापूर (प्रतिनिधी) :भारताचे गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांचे शुक्रवारला रात्री उशिरा कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. ते कोल्हापूर इचलकरंजीच्या एकदिवशीय दौऱ्यावर आले आहेत. रात्री त्यांचा मुक्काम शासकीय विश्राम गृहावर आहे.

    कोल्हापूर विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी खासदार धनंजय महाडिक,विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा,जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड,जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, विजय जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

     केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उद्या २० जूनला शनिवारी सकाळी ११ वाजता श्री. महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळातील अन्य सदस्य यासाठी उपस्थित राहणार आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

१४४५.९७ कोटींच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ

१४४५.९७ कोटींच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या …