no images were found
शिवाजी विद्यापीठामध्ये महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात
कोल्हापूर :- शिवाजी विद्यापीठामध्ये महाराणा प्रतापसिंह यांची जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ.रामचंद्र पवार, क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ.शरद बनसोडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.कबीर खराडे, सहा. प्राध्यापक यशोधन बोकील, अनिल साळोखे, जांबवंत शेळके, चंद्रकांत कांबळे, दिपा साबळे यांचेसह विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्रशासकीय सेवक, अधिकारी आणिक शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.