no images were found
गोरगरिबांचे रेशन बंद कराल तर रेशन दुकानदारांच्या दारात नोटिसांची होळी करू ; करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा इशारा..
*करवीर तालुक्यातील अनेक गावातील रास्त भाव दुकानदारामार्फत अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थीना पाठविलेल्या नोटीसांबाबत
*पात्र सर्वच वंचित नागरिकांना (घटकांना) योजनेअंतर्गत रेशनचा लाभ मिळावा याबाबत..
कोल्हापूर (प्रतिनिधी):शासनामार्फत आपण पाठविलेल्या नोटीसा मधुन अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थीना प्रत्येक गावातील रास्तभाव दुकानदारामार्फत त्यांच्या शिधापत्रिकेबाबत अनेक नको त्या वेगवेगळ्या कारणास्तव त्यांनी कारण न दिलेस त्यांना मिळणारी अन्न धान्य सुरक्षा बंद होणार असे लेखी म्हणणे देणेस सांगितले आहे. आपण पाठविलेल्या नोटीसामध्ये प्रामुख्याने १) लाभार्थी कंपनीचा संचालक नसला पाहिजे म्हणजे त्यांचा ठोस असा कोणताही उल्लेख नाही. २) शिधापत्रिका लाभार्थी हा आय.टी. रिटर्न भरलेला नसावा असे समजते, आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक असलेने आपणांस प्रत्येकाचा संपूर्ण डेटा समजतो. तरी रिटर्न भरणा व्यक्ती श्रीमंतच असतो असे नाही. त्याला त्याच्या दैनंदिन जीवण जगनेसाठी उदा. स्वतःचे घर, टू व्हिलर गाडी, छोटा मोठा व्यवसाय, प्रापंचित साहित्य, वस्तु खरेदी करणेसाठी आय.टी. रिटर्न हा भरावाच लागतो. त्याशिवाय त्यांना बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे हा नियमच बेकायदेशीर आहे. ३) जे भूमीहित आहेत, अल्प भूधारक आहेत अशांना देखील आपण नोटीस दिलेल्या आहेत.
राजू यादव करवीर तालुकाप्रमुख म्हणाले की,अनेक लाभार्थी खरोखर वंचित आहेत व रेशनकार्डवर ज्यांची नावे नाहीत, ऑनलाईन नावे नोंद आहेत. उदा. लग्न झालेल्या मुली, लहान मुले यांना देखील लाभ मिळावा. जे स्वइच्छेने स्वतःचे रेशन बंद करणार असतील त्यांचे रेशन शासनाने बंद करावे, कोणत्याही अटी लावू नयेत, चोर सोडून संन्यासाला त्रास देवू नये गोरगरीबांचे रेशन शासन अन्न सुरक्षा योजनाअंतर्गत बंद करण्याच्या प्रयत्नात आहे ते त्वरित थांबवावे अन्यथा करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गावागावात प्रत्येक रेशन दुकानदाराच्या दारात आपण पाठविलेल्या नोटीसांची होळी करण्याचे आंदोलन करण्यात येईल.*
*पोपट दांगट बोलताना म्हणाले की, “मिशन सुधार राईटफुल टारगेट”, अंतर्गत सर्वच चालू असलेल्या गोरगरिबांचे राशन बंद करण्याचा हा भाजप सरकारचा डाव शिवसेना हाणून पाडेल यावेळी नायब तहसीलदार भालचंद्र यादव व पुरवठा अधिकारी विकास देसाई यांनी आपल्या भावना वरिष्ठ पातळीवर कळवून तात्काल यावर तोडगा काढण्याबाबत आश्वासन दिले.
यावेळी उपस्थित करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, फेरीवाले संघटना बाळासाहेब नलवडे, ग्राहक सेना जितू कुबडे, युवा सेना सचिन नागटिळक, कामगार सेना राजू सांगावकर, प्रकाश मुदुगडे , वाहतूक सेना दिनेश परमार, युवा सेना संतोष चौगुले, वाहतूक सेना दत्ता फराकटे, फेरीवाले संघटना कैलास जाधव, दिपक पोपटाणी, सुनील पारपाणी, दिपक अंकल, किशोर कामरा, मोहन रजपूत, बाबुराव पाटील आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.