
no images were found
शिंदे-ठाकरेंमध्ये पहिली लढत, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी मातोश्रीवरून उमेदवार जाहीर
मुंबई : सत्तानाट्यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात पहिली लढत होणार आहे. अंधेरी पूर्वच्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी उमेदवाराची घोषणा केली आहे. अंधेरी पूर्वमधून शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन झालं होतं, त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेदवारी दिली आहे.
ऋतुजा लटके यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. अंधेरी पूर्वची ही पोटनिवडणूक कधी होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे, कारण एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरचा हा पहिलाच सामना आहे. तसंच या निवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार, हेदेखील महत्त्वाचं ठरणार आहे.