
no images were found
.टोयोटा किर्लोस्कर मोटरकडून मुंबईत २४ तासांच्या टोयोटा हॅकेथॉन २०२५ चा समारोप
मुंबई,: रस्ता सुरक्षेसाठी जनजागृती आणि प्रशिक्षणाबाबत वचनबद्धतेची पुष्टी करत, टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने विद्यालंकार इन्स्टिट्यूट, वडाळा (पूर्व), मुंबई येथे आयोजित २४ तासांच्या टोयोटा हॅकेथॉन २०२५ चा यशस्वी समारोप केला.’रस्ता सुरक्षा महिना ‘ (१८ जानेवारी – १७ फेब्रुवारी २०२५) च्या अनुषंगाने आयोजित या कार्यक्रमात मुंबईतील १००हून अधिक शाळांमधील ४०० पेक्षा जास्त प्रतिभावान विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.ज्यामुळे रस्ते सुरक्षेच्या गंभीर आव्हानांवर कृतीशील उपाय विकसित करण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध झाले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र सरकारचे माननीय ओबीसी कल्याण, दुग्धविकास आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री अतुल मोरेश्वर सावे, सन्माननीय अतिथी म्हणून चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष श्री. अर्प्रित सावे आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर चे वरिष्ठ नेतृत्व, कॉर्पोरेट अफेयर्स अँड गव्हर्नन्सचे देशपातळीवरील प्रमुख आणि एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट श्री. विक्रम गुलाटी आणि मुख्य कम्युनिकेशन ऑफिसर, सीनियर व्हाईस प्रेसिडेंट आणि स्टेट अफेयर्सचे प्रमुख श्री. सुदीप दळवी उपस्थित होते.
जगभरात दरवर्षी रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंची संख्या सर्वाधिक आहे. दरवर्षी, एकटया भारतात रस्ते अपघातांमुळे १,५०,००० हून अधिक मृत्यू होतात. ज्यामध्ये ५-२९ वयोगटातील व्यक्ती रस्ते वाहतुकीतील दुखापती हे मृत्यूचे प्रमुख कारण ठरतात. हे संकट ओळखून, टोयोटा किर्लोस्कर मोटर ने २०१८ मध्ये शाळा आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षा समाविष्ट करण्यासाठी टोयोटा हॅकेथॉन सुरू केली. टोयोटा किर्लोस्कर मोटर च्या व्यापक रस्ते सुरक्षा उपक्रमाचा महत्त्वाचा आधारस्तंभ असलेली टोयोटा हॅकेथॉन ही शाळा आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षा शिक्षण समाविष्ट करून या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी तयार करण्यात आलेले अभियान आहे.गंभीर विचारसरणी, नावीन्य आणि जबाबदारीची भावना वाढवून हॅकेथॉन तरुणांना त्यांच्या समुदायांमध्ये सकारात्मक वर्तनात्मक बदल घडवून आणण्यासाठी सक्रिय उपाय सुचविते. सोबतच यातून तरुणांना ‘बदलांचे प्रतिनिधी बनण्यास सक्षम करते. शून्य वाहतूक अपघात साध्य करण्याच्या टोयोटाच्या जागतिक दृष्टिकोनाशी सुसंगत हॅकेथॉनमधून डिजिटल आणि धोरण-चालित उपायांवर भर दिला जातो. यातून अपघात कमी करण्यासाठी आणि सुरक्षित रस्ते तयार करण्यासाठी प्रभावी धोरणे सुचविताना रस्ते सुरक्षेच्या महत्त्वाच्या समस्यांवर चर्चा केली जाते. पाच टप्प्यांमध्ये आधारित हॅकेथॉनचा प्रवास संघ निवड आणि कल्पना सादर करण्यापासून सुरू झाला. बूट कॅम्पमधून पुढे जात या प्रवासाचा २४ तासांच्या अंतिम हॅकेथॉनमध्ये समारोप झाला. प्रत्येक शहरातील अव्वल विजेत्यासाठी इनक्युबेशन समर्थनासह त्याचा समारोप करण्यात आला. सुरुवातीच्या १०० संघांपैकी २८ संघ पोस्ट-बूट कॅम्पमध्ये पोहोचले. यातून निवडलेले १० संघ अंतिम हॅकेथॉनमध्ये पोचले. त्यापैकी ३ संघ विजेते म्हणून घोषित करण्यात आले. त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.
सहभागींनी या प्रमुख रस्ता सुरक्षा विषयांवर चर्चा केली.
• रस्ता सुरक्षा जागरूकता आणि प्रशिक्षण
• सुरक्षिततेसाठी समुदाय सहभाग
• शालेय क्षेत्र सुरक्षा
• रस्ते पायाभूत सुविधा आणि प्रदूषण
• रस्ता सुरक्षेत आयओटी/आयसीटी
• वाहतूक सुलभता
• रस्ते समावेशक बनवणे
मुंबईतील यशानंतर, टोयोटा हॅकेथॉन २०२५ ही १४ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथेही होणार आहे. २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी, टीकेएमने ४०० हून अधिक नाविन्यपूर्ण संकल्पना आधीच सादर केल्या आहेत. यातून देशातील प्रमुख शहरांमधील ३०० संस्थांमध्ये हा उपक्रम विस्तारित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा उपक्रम केवळ सुरक्षित भविष्यासाठी टोयोटाच्या दृष्टिकोनाला बळकटी देत नाही तर पुढील पिढीला गंभीर सामाजिक आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांचे ज्ञान आणि सर्जनशीलता वापरण्यास प्रेरित करतो.
याप्रसंगी उपस्थित, महाराष्ट्र राज्य सरकार ओबीसी कल्याण, दुग्धविकास आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री श्री अतुल मोरेश्वर सावे म्हणाले, “टोयोटा हॅकेथॉन २०२५ हा एक उल्लेखनीय उपक्रम आहे. जो खरोखरच नाविन्य आणि सहकार्याच्या भावनेला मूर्त रूप देतो. विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना एकत्र आणून आणि त्यांना रस्ते सुरक्षेच्या महत्त्वाच्या समस्यांना तोंड देण्यासाठी प्रोत्साहित करून, टोयोटा केवळ तांत्रिक कौशल्ये वाढवत नाही तर सामाजिक जबाबदारीची भावना देखील विकसित करत आहे. हे तरुण सहभागी असे उपाय विकसित करत आहेत ज्यांच्यात रस्ते सुरक्षेच्या क्षेत्रात कायमस्वरूपी प्रभाव पाडण्याची क्षमता आहे. तरुणांशी संवाद साधण्यात आणि त्यांच्या दूरदर्शी कल्पनांना व्यावहारिक, जीवनरक्षक उपायांमध्ये रूपांतरित करण्यासाठी आवश्यक संसाधने आणि मार्गदर्शन प्रदान करण्यात टोयोटाची अशी वचनबद्धता पाहून आनंद होतो. हा उपक्रम सुरक्षित, स्मार्ट आणि अधिक समावेशक भविष्य घडवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे आहे.”
हॅकेथॉनबद्दल आपले विचार मांडताना, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष श्री. अर्प्रित सावे म्हणाले, “टोयोटा हॅकेथॉन २०२५ हा एक परिवर्तनकारी उपक्रम आहे. जो समकालीन सर्वात गंभीर आव्हानांपैकी एक रस्ता सुरक्षेला तोंड देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. यातून नवोपक्रम आणि तरुणांच्या सहभागाची शक्ती अधोरेखित होते. टोयोटाच्या दृष्टिकोन आणि मुलभूत सुविधांच्या पाठिंब्यामुळे विविध पार्श्वभूमीतील तरुण मने एकत्र येऊ शकले. यातून समुदायांमध्ये खरा बदल घडवून आणला जाऊ शकतो. असे व्यावहारिक, जीवनरक्षक उपाय विकसित करणे उल्लेखनीय आहे. या उदययोन्मुख तरुणांना मार्गदर्शन करत त्यांच्या कल्पनांना पाठिंबा देण्याचे टोयोटाचे प्रयत्न भविष्यातील सकारात्मक बदलांसाठी पोषण आणि अनुकरणीय आहे. यातून टोयोटाची समाजाशी असलेली वचनबद्धता सिद्ध होते. यासारखे उपक्रम कॉर्पोरेट क्षेत्रातील सामाजिक जबाबदारीचे क्षितीज ओलांडत व्यक्ती, संस्था आणि समुदायांची सुरक्षितता, सहकार्य आणि शाश्वततेला प्राधान्य देण्यासाठी प्रेरित करतात. रस्ते अधिक सुरक्षित, गतिशील आणि अधिक स्मार्ट बनवण्यासाठी टीकेएमचे हे प्रयत्न आणि समर्पण खरोखरच कौतुकास्पद आहे.
या कार्यक्रमात बोलताना, टोयोटा किर्लोस्कर मोटरचे कंट्री हेड आणि एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट, कॉर्पोरेट अफेयर्स अँड गव्हर्नन्स श्री. विक्रम गुलाटी म्हणाले, “टोयोटा किर्लोस्कर मोटर समुह समाजाशी वचनबद्ध आहे. या प्रयत्नांमधून तरुण पिढीला योग्य साधने, मार्गदर्शन आणि संधी देऊन सक्षम केले जाते. यातून भविष्यातील सकारात्मक परिवर्तन घडू शकते. टोयोटा हॅकेथॉन २०२५ हे रस्ते सुरक्षा आणि नावीन्यपूर्णतेबद्दलच्या आमच्या अढळ वचनबद्धतेचे प्रतिक आहे. तरुणांच्या मनातील सुरक्षित रस्त्यांसाठी कल्पना, सहयोग आणि उपाय विकसित करण्यासाठी हे सक्षम व्यासपीठ आहे. हा उपक्रम टोयोटाच्या शून्य वाहतूक अपघातांच्या जागतिक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. सोबतच यातून सुरक्षितता आणि शाश्वततेची संस्कृती तयार करण्याची समग्र दृष्टि यातून प्रतिबिंबित होते. सुरक्षित भविष्यासाठी स्मार्ट आणि अधिक समावेशक कृतीतून बदलत्या आव्हानांना संधींत रूपांतरित करणारे हे तरुण ‘बदलाचे प्रतिनिधी’ म्हणून पुढे येत आहेत हे पाहून अभिमान वाटतो.”
या प्रसंगी बोलताना, वरिष्ठ उपाध्यक्ष आणि राज्य व्यवहार प्रमुख श्री. सुदीप दळवी म्हणाले, “रस्ता सुरक्षा ही एक सामायिक जबाबदारी आहे यावर टोयोटा किर्लोस्कर मोटर समुहाचा विश्वास आहे. ऑटोमोटिव्ह नवोपक्रमांच्या पलीकडे जाऊन संधी निर्माण करणे हा त्या मागचा उद्देष आहे. यातून समुदायांमध्ये जागरूकता, जबाबदारी आणि सक्रिय वर्तन वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. टोयोटा हॅकेथॉन २०२५ या दृष्टिकोनाचे ज्वलंत उदाहरण आहे. भारतातील तरुणांची सर्जनशीलता आणि कौशल्य यातून सिद्ध होते. रस्ते सुरक्षा आव्हानांवर वास्तविक जगातील उपाय विकसित करण्यात हे आजचे तरुण सक्षम आहेत. यातून समोर येणारे हेच तरुण भविष्यातील भारतात सर्वांसाठी शाश्वत गतिशीलता आणि सुरक्षित रस्ते तयार करण्यात सक्षम होतील, याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या कल्पनांना मूर्त रुप देण्यास टोयोटा मोटर्स समुह वचनबद्ध आहे.”टोयोटा हॅकेथॉन २०२५ भारतातील रस्ते सुरक्षा आणि शाश्वत गतिशीलता वाढवण्यासाठी टीकेएमच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकणारे आहे. एक प्रमुख सीएसआर उपक्रम म्हणून, हे टोयोटा सेफ्टी एज्युकेशन प्रोग्राम ला पूरक आहे. २००७ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमातून आतापर्यंत ८,००,००० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. तरुण नवोन्मेषकांना कल्पनांना प्रभावी उपायांमध्ये रूपांतरित करण्यासाठी सक्षम आहेत. हॅकेथॉन सर्जनशीलता, सहकार्य आणि सामाजिक जबाबदारीला चालना देते. शिक्षण आणि नवोपक्रमाद्वारे, टोयोटा किर्लोस्कर मोटर्स नव्या पिढीला सुरक्षित रस्त्यांचे समर्थन करण्यासाठी आणि सर्वांसाठी सुरक्षित, समावेशक भविष्य घडविण्यासाठी प्रेरित करत आहे.