Home शासकीय रंकाळा टॉवर येथील आरक्षित पार्किंगच्या जागेवर गुरुवारपासून पार्किंग सुरु

रंकाळा टॉवर येथील आरक्षित पार्किंगच्या जागेवर गुरुवारपासून पार्किंग सुरु

8 second read
0
0
22

no images were found

रंकाळा टॉवर येथील आरक्षित पार्किंगच्या जागेवर गुरुवारपासून पार्किंग सुरु

कोल्हापूर (प्रतिनिधी): -रंकाळा टॉवर ए वॉर्ड सिसनं.1644 मधील सर्व समावेक्षक आरक्षणाच्या माध्यमातून पार्किंगची जागा महापालिकेच्या ताब्यात आलेली आहे. या जागेवरील पार्किंग गुरुवारपासून सुरु करण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज दिल्या.  मगील आठवडयात प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी पार्किंग आठ दिवसात सुरु करण्याच्या सूचना इस्टेट ऑफिसर यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सकाळी प्रशासकांनी या पार्किगच्या ठिकाणी आवश्यक ती लाईटची व्यवस्था व गाडया आत येणा-या प्रवेशद्वारजवळ लोखंडी जाळी, पार्किंगचे बोर्ड, पार्किंगचे पट्टे मारले का याची समक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी लाईटची मोडतोड केल्याने ते काम लवलकरात लवकर पुर्ण करण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या.  यावेळी पट्टेची इतर कामे पुर्ण झाली असल्याने उद्यापासून पार्किंग सुरु करण्याच्या सूचना केल्या. या पार्किंगच्या ठिकाणी इस्टेट विभागाचा एक कर्मचारी उपलब्ध ठेवण्यात आला आहे. त्याच्या मार्फत नियमाप्रमाणे तासाला भाडे आकरण्यात येणार आहे. या ठिकाणी येण्यापूर्वी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दुधाळी शुटींग रेंजची पाहणी केली. या ठिकाणी नव्यान 50 मीटर व 25 मीटर रेंज व कंपौंड वॉल तयार करण्यासाठी आवश्यक तो प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या. तसेच या ठिकाणी पार्किंगमध्ये असणारी गॅसची गाडी ताबडतोब हटवून पुन्हा या ठिकाणी गाडी उभी राहिल्यास संबंधित एजन्सीला दंड करण्याच्या सूचना इस्टेट ऑफिसरांना दिल्या.

         यावेळी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उप-शहर अभियंता सुरेश पाटील, महादेव फुलारी, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…