
no images were found
शरण साहित्य अध्यासन कार्यारंभानिमित्त
शनिवारी डॉ. अरविंद जत्ती यांचे व्याख्यान
कोल्हापूर, (प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात येत्या शनिवारी (दि. १ फेब्रुवारी) शरण साहित्य अध्यासनाच्या कार्यारंभानिमित्त बंगळुरू येथील बसव समितीचे अध्यक्ष डॉ. अरविंद जत्ती यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यासनाच्या समन्वयक डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी दिली आहे.
शनिवारी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात डॉ. अरविंद जत्ती हे ‘शरण साहित्य: संकल्पना आणि प्रासंगिकता’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी असतील. कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि बसवकल्याण येथील अनुभवमंटपाचे अध्यक्ष डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांची प्रमुख उपस्थिती असेल. या व्याख्यानाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. करेकट्टी यांनी केले आहे.