no images were found
ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे भीषण अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू
मुंबई :- एक कंटेनर महामार्गावरुन जात असताना त्याचा ब्रेक फेल झाला आणि तो थेट हॉटेलमध्ये शिरला. या भीषण अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण जखमी झाले आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर हे गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर येतं. याच गावाजवळ आज दुपारी 12 वाजताच्या दरम्यान ही अपघाताची घटना घडली.सध्या अपघातस्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
महामार्गावरुन जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि तो थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या हॉटेलमध्ये शिरला. या अपघातात आधी पाच जणांचा जागीच चिरडून मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत होती. या अपघातात आता मृतांची संख्या वाढली असून आता मृतांचा आकडा 12 वर पोहोचला आहे. अपघात काहीजण जखमी झाले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
कंटनर हॉटेलमध्ये शिरल्यानं अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी हॉटेलच्या बाहेर इतरही अनेक वाहानं उभी होती. कंटेनर हॉटेलमध्ये शिरताना त्या वाहानांनाही धडकला. या अपघातातील जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.