no images were found
डिजिट लाईफ इन्शुरन्सने ग्लो टर्म लाईफ इन्शुरन्स लाँच केला
भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या नवीन युगातील डिजिटल जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या गो डिजिट लाइफ इन्शुरन्स लिमिटेड (डिजिट लाइफ) ने घोषणा केली की त्यांनी त्यांचा पहिला इंडिव्हिज्यूयल प्यूअर टर्म लाइफ इन्शुरन्स प्लॅन “डिजिट ग्लो टर्म लाइफ इन्शुरन्स” लाँच केला आहे, जो विशेषतः सेल्फ- एम्प्लॉइड असलेल्या भारतीयांसाठी डिझाइन केलेला आहे. ग्राहकांना सुलभ सेवा आणि एजंट्सना जलद ऑनबोर्डिंग देण्यासाठी, डिजिट लाइफ इन्शुरन्सने मुंबईतील अंधेरी पूर्व, कोल्हापूरमधील राजारामपुरी आणि पुणे येथील शिवाजीनगर येथे कार्यालये उघडली आहेत.
देशातील सेल्फ-एप्लॉइड असलेल्या व्यक्तींमध्ये आर्थिक समावेश वाढवण्याच्या उद्देशाने, डिजिट लाईफ इन्शुरन्स, त्यांच्या इन-हाऊस बिल्ट टेक-एनॅबल्ड मॉडेल्सद्वारे, चांगल्या आर्थिक अंडररायटिंगसाठी विविध अद्वितीय डेटा पॉइंट्स आणि पर्यायी क्रेडिट पॅरामीटर्सचा वापर करेल. सरकारी आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील 47% लोक सेल्फ- एम्प्लॉइड आहेत असा अंदाज आहे. भारतात 300 मिलियन हून अधिक व्यक्ती सेल्फ-एम्प्लॉइड असण्याचा अंदाज आहे ज्यांना उत्पन्नातील चढ-उतार, उत्पन्नाच्या पुराव्यांचा अभाव इत्यादी विविध आव्हानांमुळे स्वतःसाठी पुरेसे मुदत जीवन विमा कव्हर खरेदी करणे कठीण जाते.
विमा सुलभीकरणाच्या आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहून, डिजिट लाईफचा टर्म प्लॅन अत्यंत कस्टमायझ करण्यायोग्य आणि परवडणारा असेल, जो अवघड कागदपत्रे आणि सेल्फ- एम्प्लॉइड व्यक्तींना सहसा तोंड द्यावी लागणारी लांब प्रक्रिया यासारख्या पारंपारिक अडचणी दूर करेल. सामाजिक क्षेत्रातील निम्न स्तरातील लोकांना विम्याकडे आणण्याच्या उद्देशाने, ही योजना रु.10 लाख पासून ते रु.1 कोटी पर्यंतच्या कव्हरसह व्यापक संरक्षण प्रदान करेल.