no images were found
ब्रिटानिया सादर करत आहे दूध मारी गोल्ड, हलक्या, क्रिस्पी टेक्शचरसोबत आता दुधाच्या चवीची मजा
ब्रिटानियाने नव्या दूध मारी गोल्डसह आपल्या मारी उत्पादनांमध्ये नवी भर घातली आहे. मैद्याचा अजिबात वापर न करता पूर्णपणे फक्त पिठापासून बनलेल्या या नव्या बिस्किटांमध्ये मारी बिस्किटांमधील मूळ हलके आणि क्रिस्पी टेक्श्चर कायम राखत त्यात दुधाच्या चवीची जोड देण्यात आली आहे. मारी बिस्किटांमध्ये अधिक सुंदर, आनंददायी चव हवी असणाऱ्या ग्राहकांसाठी ही बिस्किटे खास तयार करण्यात आली आहेत.
दूध मारी गोल्डमध्ये एक अनोखी चव आणि मारी बिस्किटांची ओळख असलेली वैशिष्ट्ये यांचा सुंदर मेळ आहे. त्यामुळे, याच उत्पादनवर्गात ग्राहकांना एक अनोखा आणि नवा अनुभव मिळतो. चव आणि टेक्श्चर यांचा समतोल साधत या नव्या बिस्किटात ब्रिटानियाने ग्राहकांच्या बदलत्या आवडींनुसार नाविन्यतेवर भर दिला आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या आवडीच्या हलक्या आणि क्रिस्पी मारी बिस्किटांमध्ये दुधाची मस्त चवही दिली आहे.
या नव्या उत्पादनाला दणक्यात सादर करण्यासाठी ब्रिटानियाने नवी जाहिरातही केली आहे. यात अगदी सहजसोप्या पद्धतीने दूध मारी गोल्डमधील हलकं, क्रीमी टेक्श्चर आणि दुधाच्या चवीचा अनुभव यांची सांगड घालण्यात आली आहे. नेहमीच्या चहाच्या वेळी घडणाऱ्या या जाहिरातीत चहासोबत दुधाच्या बिस्किटांचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांवर भर देण्यात आला आहे.
दूध मारी गोल्डसह ब्रिटानिया दैनंदिन उत्पादनाच्या विभागात ग्राहकांच्या बदलत्या आवडीनुसार अधिक समृद्ध अनुभव देऊ करत आहे. ग्राहकांच्या आवडीचा मारी बिस्किटांमधील हलका आणि क्रिस्पीनेस कायम राखत यात अनोख्या पद्धतीने दुधाची चव समाविष्ट करण्यात आली आहे. रोजच्या जगण्यात चहाच्या वेळेचा अनुभव अधिक खास करण्यासाठी हा एक योग्य पर्याय आहे.