
no images were found
मणिपाल हॉस्पिटल्स बाणेर च्या डॉक्टरांची ३१ वर्षीय महिलेवर केले यशस्वी उपचार
पुणे नुकतेच बाणेरच्या माणिपाल हॉस्पिटल्स मधील डॉक्टरांनी हृदयाशी संबंधित विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या ३१ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. या तरुणीवर दोन मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून तीचा अरिथमिया आणि ब्लॅकआऊटच्या मोठ्या समस्यांचा त्रास अशा दोन गंभीर तक्रारींमुळे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. सखोल तपासणी केल्यानंतर असे आढळून आले की तिचे पेसमेकर नीट काम करत नाहीये. २ डी इको केल्यानंतर असेही आढळले की तिच्या हृदयाचे ठोके ही अनियमित आहेत. डॉ. अभिजित जोशी यांनी तिच्या अरिथमियावर उपाय करण्यासाठी पेसमेकर बदलण्याचा निर्णय घेतला. पण तिच्या हृदयाच्या व्हॉल्व्ह नीट काम करत नसल्यामुळे डॉ. श्रीरंग रानडे आणि त्यांच्या टिम ने अतिशय आपात्कालीन अशा स्थिती दोन्ही बाजूच्या डबल हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी केली आणि रुग्णाचा जीव वाचवला.
हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी या प्रक्रिये मध्ये हृदयातील व्हॉल्व्ह्स जागी कृत्रिम अशा व्हॉल्व्ह बसवण्यात येतात आणि त्यामुळे हृदयाची रक्ताला पंप करण्याची क्षमता वाढवण्यात येते. या अनोख्या केस मध्ये रुग्णाच्या हृदयावर या आधी सुध्दा दोन मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. २०१५ मध्ये करण्यात आलेल्या दोन सर्जरीज मधील पहिली म्हणजे मायट्रल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (एमव्हीआर) सर्जरी आणि दुसरी म्हणजे हृदयाचे ठोके कमी असल्यामुळे पेसमेकर बसवण्याची शस्त्रक्रिया होय. पहिल्यांदा हृदयाचे ठोके नियमित करण्यासाठी पेसमेकर बसवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला पण हृदयाच्या व्हॉल्व्ह मध्ये समस्या निर्माण झाल्याने प्रकृतीत कोणतीच सुधारणा होत नव्हती. कारण हृदयाचा व्हॉल्व्ह हा अडकत असल्यामुळे त्याचा ताण फुप्फुसे आणि यकृतावर पडत होता.
यावेळी बोलतांना पुण्यातील बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटल्स च्या कार्डिओलॉजी विभागाचे कन्सल्टंट आणि एचओडी डॉ. अभिजित जोशी यांनी सांगितले “रुग्णाला श्वास घेण्याच्या समस्ये सह ब्लॅकआऊट सारख्या समस्यांमुळे अतिशय गंभीर परिस्थितीत रुग्णालयात आणण्यात आले होते. तरुण रुग्णाला अशा स्थितीत आणि हृदयात पेसमेकर लावलेल्या स्थितीत आणणे ही खूपच आश्चर्यकारक गोष्ट होती. आम्ही आयसीयू मध्ये लगेच तिची समस्या समजून घेतली रक्तदाब नॉर्मल रेंज मध्ये राहण्यासाठीची औषधे सुरु केली. पेसमेकर बदलल्या नंतरही सुधारणा दिसून येत नव्हती आणि तिच्या हृदयाचे ठोके कमी होत होते. पुन्हा एकदा २डी इको केल्यानंतर असे आढळून आले की तिच्या हृदयातील पूर्वी बदलण्यात आलेला व्हॉल्व्ह हा संपूर्णत: चोक होण्याच्या मार्गावर असून दुसर्या डाव्या बाजूच्या व्हॉल्व्ह मधून थोडा रक्तस्त्राव होत होता. डॉ. भूषण नगरकर, आयसीयू प्रमुख, डॉ. सुहास सोनवणे, कार्डियाक ॲनेस्थेटिस्ट, कार्डियाक परफ्युजनिस्ट, सम्राट बागल आणि नलिनी अवगुणे यांच्या सहकार्यामुळे आम्ही रुग्णाला सर्वोत्तम उपचार देऊ शकलो आणि तिला नवीन जीवन देऊ शकलो.”
या केसच्या गंभीरते विषयी बोलतांना कार्डिओथेरॉकिक ॲन्ड व्हस्क्युलर सर्जरी चे कन्सल्टंट आणि एचओडी डॉ. श्रीरंग रानडे यांनी सांगितले “ ही केस आमच्यासाठी खूपच आव्हानात्मक होती कारण तिच्या हृदयाला आधीच हानी पोहोचलेली होती आणि त्याच बरोबर यकृत आणि फुप्फुसांवर सुध्दा परिणाम होत होता. पूर्वी करण्यात आलेल्या सर्जरी मुळे हृदया बरोबरच जवळपासच्या अवयवांवरही परिणाम होऊ शकत होता आणि रुग्णाच्या हृदयाला वेगळे काढून कार्डिओपल्मनरी बायपास करणे हे सुध्दा एक मोठे आव्हान होते. त्याच बरोबर पूर्वी लावण्यात आलेले त्रासदायक व्हॉल्व्ह्ज काढणे तेही तिच्या हृदयाला कोणतीही इजा पोहोचू न देता करणे ही गोष्ट खूपच आव्हानात्मक होती. तिची गंभीर परिस्थिती पाहता आणि आव्हानात्मक स्थिती पाहता ही शस्त्रक्रिया संपूर्ण रात्रभर सुमारे ८ तास चालली. तिचे हृदय हे शस्त्रक्रियेनंतर खूपच अशक्त बनले होते आणि त्याचे आरोग्य सुधारण्यापूर्वी तिला सीपीबी (कार्डिओपल्मनरी बायपास मशीन) वर ठेऊन तिच्यावर उपचार करण्यात आले.