no images were found
कुख्यात दहशतवाद्याला एनआयएकडून दिल्लीत अटक
कुख्यात खलिस्तानी दहशतवादी कुलविंदरजीतला पकडण्यासाठी पोलिसांनी 5 लाख रुपयांचे इनामही जाहीर केले होते.
नवी दिल्ली : देशविघातक कारवायांमध्ये सहभागी असणा-या खलिस्तानी दहशतवादी संघटनांविरोधात एनआयएला मोठे यश लाभले. दिल्ली विमानतळावरुन खलिस्तानी संघटनांशी संबंधित कुख्यात दहशतवाद्याला एनआयएने ताब्यात घेत त्याला अटक करण्यात आली.
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कुलविंदरजीत सिंग उर्फ खानपुरिया नावाच्या या दहशतवाद्याला अटक करण्यात आली. बँकॉकहून कुलविंदरजीत सिंग उर्फ खानपुरिया हा १८ नोव्हेंबर रोजी दिल्लीत आला होता. यावेळी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून खानपुरिया याला ताब्यात घेतले. बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि खलिस्तान लिबरेशन फोर्स या खलिस्तानी दहशतवादी संघटनांशी खानपुरिया याचे संबंध असून अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये तसेच पंजाबातील अनेक हत्याकांडांमध्येदेखील कुलविंदरजीत सिंग उर्फ खानपुरियाचा सहभाग होता. तो 2019 पासून फरार होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी 5 लाख रुपयांचे इनामही जाहीर केले होते. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कुलविंदरजीत सिंग उर्फ खानपुरिया नावाच्या या दहशतवाद्याला अटक करण्यात आली.