no images were found
केंद्र शासनाची राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना गरीब कुटुंबांना मोठा आधार
केंद्र शासनाची राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना गरीब कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत आहे. घरातील कुटुंबप्रमुख किंवा कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यास या योजनेतून त्या कुटुंबाला एकरकमी २० हजार रुपये मिळतात. गेल्या सात महिन्यात जिल्ह्यातील ४० कुटुंबियांना ८ लाखांची मदत या योजनेतून देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून ही कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजना राबवण्यात येते. या योजेनंतर्गत कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला एकरकमी २० हजार रुपयांची मदत या योजनेतून दिली जाते. परंतु या योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यामध्ये काही निकष असून ती व्यक्ती दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील असणे अनिवार्य आहे. तेव्हा त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला किंवा त्याच्या वारसाला हे २० हजाराचे अर्थसहाय्य देण्यात येते. केंद्र सरकारने ही मदत मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना सुरू केली आहे.