Home मनोरंजन अंजली दुर्गाई यांच्या संकल्पनेतून”साज-ए-दिल छेड दे – आठवणींना आज उजाळा देणारी सुरेल मैफल 

अंजली दुर्गाई यांच्या संकल्पनेतून”साज-ए-दिल छेड दे – आठवणींना आज उजाळा देणारी सुरेल मैफल 

4 second read
0
0
67

no images were found

अंजली दुर्गाई यांच्या संकल्पनेतून”साज-ए-दिल छेड दे – आठवणींना आज उजाळा देणारी सुरेल मैफल 

कोल्हापूर: जुन्या-नव्या हिंदी गीतांच्या सुरांमध्ये हरवून जाण्याची संधी संगीतप्रेमींना आज मिळणार आहे. अंजली दुर्गाई यांच्या संकल्पनेतून साकार झालेली “साज-ए-दिल छेड दे” या लोकप्रिय संगीत मैफिलीचा चौथा पर्व आज सादर होणार आहे.

ही मैफल म्हणजे काळाच्या ओघात मागे पडलेली, पण मनातून कधीच न जाणारी गाणी पुन्हा ऐकण्याचा एक अनोखा अनुभव असणार आहे. स्टेजवर क्वचितच सादर होणारी, पण रसिकांच्या हृदयात घर करून राहिलेली गीते आज संध्याकाळी ऐकायला मिळणार आहेत.

“छेड मेरे हमराही…” या ओळीने सुरू होणारी ही मैफल फक्त संगीतापुरती मर्यादित न राहता, भावना, आठवणी आणि नव्या सुरांचा सुंदर संगम घडवून आणणार आहे. अंजली दुर्गाई यांनी ही संकल्पना रसिकांना एक वेगळी संगीतमय संध्याकाळ देण्याच्या उद्देशाने साकारली आहे.

आयोजकांच्या मते, ही संध्याकाळ संगीत, भावना आणि आठवणींच्या अनोख्या प्रवासाची साक्षीदार ठरणार आहे. जुन्या गाण्यांच्या आठवणींना उजाळा देत, नव्या पिढीला त्याची ओळख करून देणे हाही या उपक्रमामागचा उद्देश आहे.संगीतप्रेमींसाठी ही हिंदी गीतांची मैफल नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव ठरेल,
आज शुक्रवार दिनांक 12 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता गोविंदराव टेंबे हॉल ,देवल क्लब येथे हा कराओके संगीत कार्यक्रम होणार आहे .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर    &nbs…