Home क्राईम CID विभागातील कर्मचाऱ्याची धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

CID विभागातील कर्मचाऱ्याची धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

4 second read
0
0
225

no images were found

CID विभागातील कर्मचाऱ्याची धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

औरंगाबाद : सध्या गुन्हे अन्वेषण विभागामध्ये कार्यरत असलेल्या एका ४२ वर्षीय कर्मचाऱ्याने चालत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.

सदर कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनिल सोनवणे हे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग औरंगाबादमध्ये अनिल सोनवणे (४२, रा. एन -६ सिडको, औरंगाबाद) शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांची नेमणूक अनुकंपावर वडिलांच्या जागी सन २०१८ मध्ये झालेली होती.

दरम्यान सोमवारी अज्ञात व्यक्तीने धावत्या रल्वेसमोर आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह वाहनातून घाटी रुग्णालयात आणला. तपासणीअंती हा मृतदेह सी.आय.डी. विभागात कार्यरत असलेल्या सोनवणे यांचा असल्याचे स्पष्ट  झाले. त्वरित पोलिसांनी या घटनेबाबत नातेवाईकांना माहिती देऊन बोलावून घेतले. पोलिसांनी अधिक तपास केला असता सोनवणे यांच्यावर कर्ज असल्याने  आणि त्यातूनच त्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले असण्याची प्राथमिक शक्यता वर्तविली. अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास  पोलिसांकडून सुरु आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…