Home शैक्षणिक मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

1 second read
0
0
253

no images were found

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई : मुंबई विद्यापीठाकडून दिनांक ३० जानेवारीला होणाऱ्या सुमारे ३० परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. राज्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

विविध अभ्यासक्रमाच्या एकूण ३० परीक्षा विद्यापीठाकडून येत्या ३० जानेवारी २०२३ रोजी घेण्यात येणार होत्या. परंतु आता या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून त्या ७ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात येतील अशी मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. यामध्ये लॉ, अभियांत्रिकी विज्ञान शाखेचे चौथी सत्र, वाणिज्य आणि इतर अभ्यासक्रमांचा समावेश होता. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीमुळे मानवता विषयाच्या पदव्युत्तर पदवी सत्र ३ री आणि ४थी, विविध अभ्यासक्रमाचे सत्र ३री, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे सत्र ३रे, विज्ञान शाखेच्या एमएससी सत्र ४थे, एम एससी भाग-२, वाणिज्य शाखेच्या, एमकॉम भाग-२ या परीक्षा 30 जानेवारी रोजी घेण्यात येणार होत्या. परंतु आता या सर्व परीक्षा ७ फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात येणार आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…