no images were found
प्रियकारानं पेटवून घेत प्रेयसीला मारली मिठी; औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार
औरंगाबाद : महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात प्रियकराने स्वतःला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारल्याचा प्रकर समोर आला आहे. या घटनेत हे दोघेही गंभीररित्या भाजले आहेत. हे दोघेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवडा विद्यापिठातील विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान या दोघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु असून या तरुणाने स्वतःला पेटवून का घेतलं याचं नेमकं कारण अद्याप समोर आले नाही. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी ही आगीवर नियंत्रण मिळवले. हे एकतर्फी प्रेमातून हा प्रकार झाला की दोघे एकमेकांना ओळखत होते याबद्दल नेमकी माहिती मिळालेली नाही. आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.या प्रकरामुळे विद्यापीठ परिसरात खळबळ माजली होती. हे तरुण-तरुणी शहरातील शासकीय विज्ञान संस्थेत मध्ये पी एच डी करत होते. या दोघांमध्ये गेल्या दीड ते 2 वर्षांपासून ओळख होती. या दोघांमध्ये प्रेमाचे संबंध असल्याचं म्हटलं जातंय. तरुणाने या तरुणीला लग्नाबद्दल विचारल्याचंही समजतंय. मात्र तरुणीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्याचीही माहिती आहे. तसेच या दोघांमध्ये आर्थिक व्यवहारही झाले होते. तरुणाने आधी स्वत:ला पेटवून घेतलं. त्यानंतर तरुणीला मिठी मारली. यामुळे तरुण 60 टक्के तर तरुणी 30 टक्के जळाली आहे. या दोघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.