Home संस्कृतिक शिवसेनेच्या वतीने “राज्याभिषेक सोहळा” उत्साहात संपन्न

शिवसेनेच्या वतीने “राज्याभिषेक सोहळा” उत्साहात संपन्न

0 second read
0
0
13

no images were found

शिवसेनेच्या वतीने “राज्याभिषेक सोहळा” उत्साहात संपन्न

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि राज्याभिषेक करून हिंदूंच्या गुलामगिरीच्या मानसिकतेला छेद दिला व समाजात अस्मितेची द्वाही फिरविली, यातून महाराजांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील सर्व भूमिपुत्रांना, या देशात आता भूमिपुत्रांचे राज्य निर्माण झाले आहे, असे आश्वस्त केले. शिवराज्याभिषेक सोहळा हा तमाम शिवभक्तांसाठी पर्वणीच असते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण राज्यभरासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी छ.शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर शहरात शिवसेनेच्या वतीने जोरदार आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन होऊन छ.शिवरायांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक अर्पण करण्यात आला. यानंतर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समस्त शिवसैनिक आणि पदाधिकारी यांच्या वतीने छ. शिवरायाना मानाचा मुजरा करण्यात आला. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “हर हर महादेव”, “छत्रपती शिवाजी महाराज कि जय” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करून नागरिकांना साखर – पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान, नगरसेवक रत्नेश शिरोळकर, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेवक अभिजित खतकर, नगरसेवक प्रसाद चव्हाण, रमेश खाडे, उदय भोसले, तुकाराम सोलोखे, सुनील जाधव, रणजित मंडलिक, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, अनिल पाटील, राहुल चव्हाण, रुपेश इंगवले, धैर्यशील जाधव, सुरेश माने, प्रशांत साळुंखे, अर्जुन आंबी, अल्लाउद्दीन नाकाडे, रियाज बागवान, धनाजी कारंडे, विजय जाधव, मंदार पाटील, कपिल केसरकर, उदय शिंदे, शैलेश साळोखे, कपिल पोवार, सौरभ कुलकर्णी, नितीन मुधाले, अजित कारंडे, गजानन भुर्के, श्रीकांत मंडलिक, किरण अतिग्रे, अंकुश निपाणीकर, मुकुंद मोकाशी, सुशील भांदिगरे, सुनील देशपांडे, क्षितीज जाधव, महिला आघाडीच्या शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील, पूजा भोर, गौरी माळतकर, पूजा कामते, सना अत्तार, मीनाताई पोतदार, शिल्पा कुपटे, युवतीसेनेच्या नम्रता भोसले यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संस्कृतिक
Comments are closed.

Check Also

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आप’तर्फे रक्तदान शिबिर

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आप’तर्फे रक्तदान शिबिर कोल्हापूर (प्रतिनिधी):शिवरा…