no images were found
३ गावठी पिस्तुलासह ६ मॅकझीन व तब्बल ३० जिवंत काडतुसे जप्त; दोघांना अटक
राजगुरुनगर : पोलिसांनी खेड तालुक्यातील शिरोली रस्त्यावर बुलेटवरून जाणाऱ्या दोन युवकांकडून ३ गावठी पिस्तुलासह ६ मॅकझीन व तब्बल ३० जिवंत काडतुसे जप्त करून त्या आरोपींना जेरबंद केले आहे. आकाश आण्णा भोकसे (वय २३) आणि महेश बाबाजी नलावडे (वय २३, दोघेही रा. कुरकुंडी, ता. खेड) अशी आरोपीची नांवे असून रविवारी रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना शिरोली बाजूकडून किवळेकडे जाणाऱ्या पाईट रस्त्यावर दोन युवक काळया रंगाच्या बुलेटवरून जात असुन त्यांच्याजवळ गावठी बनावटीचे पिस्तुल असल्याचा सुगावा मिळाला होता. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना अडविले. त्या दोघांच्या झडतीमध्ये आकाश भोकसे यांच्या कंबरेला खोचलेले दोन्ही बाजूस २ लोंखडी गावठी पिस्टल मॅकझीनसह मिळून आले. सोबतच पॅन्टच्या खिशात २ मॅकझिन जिवंत काडतुसे भरलेल्या मिळून आल्या. सोबतचा त्याचा मित्र महेश नलावडे याच्याकडे कंबरेला १ गावठी पिस्टल मॅकझीनसह मिळाले तर खिशात १ जिवंत काडतुसे भरलेली मॅकझीन मिळून आली.
एकूण ३ गावठी पिस्टल आणि ३ मॅकझीन प्रत्येकी ५ जिवंत काडतुसे भरलेल्या आणि पिस्टलमधे प्रत्येकी ५ जिवंत काडतुसे भरलेल्या अवस्थेत या दोन्ही आरोपींकडे मिळाली. जप्त करण्यात आलेल्या या मुद्देमाल १ लाख ६१ हजार रुपये किमतीचा असून ही कारवाई पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गद्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नेताजी गंधारे, शिवाजी ननवरे, गणेश जगदाळे, विक्रमसिंह तापकीर, विजय कांचन, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, धिरज जाधव , निलेश सुपेकर दगडू वीरकर यांच्या पथकाकडून करण्यात आली.