
no images were found
शिक्षकांसाठी राज्य सरकारचे ११६० कोटींचे पॅकेज जाहीर
नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांसाठी ११६० कोटीच पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजचा ६० हजार शिक्षकांना लाभ होईल असे भाजपा शिक्षक आघाडीचे नागपूर विभागीय संयोजक अनिल शिवणकर यांनी सांगितले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षकांच्या मागण्यांवर विचार करून हे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. अघोषित शाळांना अनुदान घोषित करावे, २० टक्के व ४० टक्के शाळांना पुढचा टप्पा घोषित करावा यासाठी शिक्षकांचे आझाद मैदानात ४० दिवसापासून आंदोलन सुरु होते. याच मागणीसाठी भाजप शिक्षक आघाडीतर्फे शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरूच होता. युती शासनाकडूनही यापूर्वी अनुदानाची तरतूद करण्यात आली होती.
दरम्यान शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे कित्तेक वर्षापासून वेतनापासून वंचित असलेल्या महाराष्ट्रातील ६० हजार शिक्षकांना दिलासा मिळेल. याबाबत बोलताना अनिल शिवणकर यांनी सांगितले कि, १००% अनुदान मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील.