Home उद्योग देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्याचे पंतप्रधान मोदी यांचे आवाहन 

देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्याचे पंतप्रधान मोदी यांचे आवाहन 

45 second read
0
0
12

no images were found

 देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्याचे पंतप्रधान मोदी यांचे आवाहन 

नवी दिल्लीहॉटेल असोसिएशन ऑफ इंडिया (एचएआय) या भारतातील हॉस्पिटॅलिटी उद्योगातील शिखर संघटनेने सुट्टी आरामात घालवणे, परिषदा घेणे, कार्यक्रमांचे आयोजन व विवाह सोहळे यांसाठी परदेशी स्थळांचा पर्याय निवडण्याऐवजी देशात प्रवास करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना केलेल्या आवाहनाचे स्वागत केले आहे. जगभरातील आर्थिक स्थिती अनिश्चिततेच्या संकटात असताना परकीय चलन जतन करण्यास यामुळे मदत होणार आहे, तसेच भारतातील देशांतर्गत पर्यटन अर्थकारण आणि व्यावसायिक प्रवास, पर्यटन व एमआयसीई स्थळ म्हणून जगातील सर्वांत आकर्षक व पसंतीच्या स्थळांमधील भारताचे स्थान हे दोन्ही भक्कम करण्यातही मदत होणार आहे.   

      भूराजकीय अस्थैर्य आणि प्रादेशिक संघर्ष जागतिक प्रवासाच्या पद्धतींवर परिणाम करत असताना स्थिर लोकशाहीचे पालन करणारे, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध व उच्चसंभाव्यता असणारे स्थळ म्हणून भारत वेगळा उठून दिसत आहे. अधिक सुरक्षित, अनुभवाधारित व मूल्याधारित स्थळांच्या शोधात असणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आकर्षित करून घेण्याची मोक्याची संधी या बदलत्या जागतिक वातावरणाने भारतापुढे ठेवली आहे. योग्य धोरणे, पायाभूत सुविधांचा विस्तार व जागतिक नकाशावर आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न आदींचे सहाय्य मिळाल्यास भारत पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या परकीय चलनाच्या गंगाजळीत भरीव वाढ करू शकतो.

        एचएआयचे अध्यक्ष व रॅडिसन हॉटेल समूहाच्या आग्नेय आशिया विभागाचे चेअरमन श्रीकेबीकचरू म्हणाले“अंतर्गत पर्यटन पुढील काही वर्षे भारताच्या हॉस्पिटॅलिटी विभागासाठी निर्णायक वाढ साधून देणाऱ्या घटकांपैकी एक ठरणार आहे. लीझर, व्यवसाय, वैद्यकीय, अध्यात्मिक व सांस्कृतिक अशा सर्व विभागांमध्ये भारत अधिकाधिक आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आकर्षित करून घेत असताना या उद्योगक्षेत्रानेही व्याप्ती, दर्जा व जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा यांच्या माध्यमातून त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. ही केवळ मागणीची पूर्तता नाही,तर एक जागतिक स्तरावर स्पर्धात्मक ठरू शकेल अशी शाश्वत पर्यटन परिसंस्था उभी करणे आहे.”

       देशांतर्गत पर्यटनामधील वाढीच्या अंदाजामुळे देशभरात पर्यटन क्षेत्रातील पायाभूत सुविधा व हॉस्पिटॅलिटी अॅसेट्स यांमधील गुंतवणुकीला गती मिळणार आहे. यामध्ये मध्यम दर्जाच्या, अव्वल दर्जाच्या व लग्झरी हॉटेल्स, रिसॉर्ट्स, वेलनेस रिट्रीट्स, क्रुझेस तसेच अध्यात्मिक व धार्मिक स्थळांचे पट्टे, वारसास्थळे व कन्वेन्शन सेंटर्स यांच्या विकासाचा समावेश होते. एकाग्र आंतरराष्ट्रीय मार्केटिंग धोरणाचे पाठबळ दीर्घकाळ मिळाल्यास लीझर, वैद्यकीय, वेलनेस, अध्यात्मिक, सांस्कृतिक व एमआयसीई अशा सर्वच विभागांतील जागतिक प्रवाशांना भारताबद्दल वाटणारे आकर्षण वाढवण्यात ही बलस्थाने लक्षणीय योगदान देऊ शकतील.

       देशात येणारा पर्यटकांचा ओघ वाढल्यास परदेशी चलनाचा ओघ आपोआपच वाढेल. हॉटेल्स, खानपान, वाहतूक, रिटेल, मनोरंजन, आरोग्यसेवा व स्थळाचे वैशिष्ट्य असणारे अनुभव यांच्यावर पर्यटकांनी खर्च केलेल्या पैशातून परदेशी चलनाच्या गंगाजळीत भर पडत राहील. दमदार देशांतर्गत मागणीसोबतच आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा भारतातील ओघ वाढल्यास एक अधिक समतोल व स्थितीस्थापक हॉस्पिटॅलिटी बाजारपेठ निर्माण होईल.

         ते पुढे म्हणाले, “सध्याच्या भूराजकीय वातावरणामुळे भारतापुढे एक अनन्यसाधारण संधी निर्माण होत आहे. जागतिक स्तरावर प्रवासी स्थिर, विश्वासार्ह आणि सांस्कृतिकदृष्ट्या वेगळा अनुभव देणाऱ्या स्थळांच्या शोधात असतात, हे बघता सर्वांच्या पसंतीचे पर्यटन केंद्र होण्याच्या दृष्टीने भारत अपवादात्मकरित्या उत्तम स्थानावर आहे. त्यामुळे परदेशी चलनातील उत्पन्न लक्षणीय वाढू शकेल आणि भारताच्या हॉस्पिटॅलिटी व पर्यटन पायाबूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यास जागतिक गुंतवणूकदार पुढे येतील.”

       परदेशी गुंतवणूक हॉस्पिटॅलिटी क्षेत्राच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. दीर्घकालीन भांडवल, जागतिक स्तरावरील तज्ज्ञांचा सल्ला, तंत्रज्ञान व हॉटेल्स, रिसॉर्ट्स, कन्वेन्शन सेटर्स आणि संबंधित पायाभूत सुविधा पुरवणे या गुंतवणुकीमुळेच शक्य होते.

       “हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील परदेशी गुंतवणूक ही भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आर्थिक संधी आहे, तिच्यातून मिळणारे लाभ फक्त या क्षेत्रापुरते मर्यादित नाहीत. हॉटेलचा कोणताही नवीन प्रकल्प सुरू झाला म्हणजे बांधकाम, लॉजिस्टिक्स, प्रतिभा, तंत्रज्ञान यांच्यातील गुंतवणुकीचे मार्ग खुले होतात, शिवाय शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागांसाठी दीर्घकाळ टिकणाऱ्या रोजगारसंधी उपलब्ध होतात,” असेही श्रीकचरु म्हणाले.

        अंतर्गत पर्यटनाला एकाग्र व शाश्वत पद्धतीने चालना दिल्यास भारताला पर्यटनातून मिळणारे परकीय चलन स्वरूपातील उत्पन्न येत्या काही वर्षांत आणखी २५-३० टक्के वाढू शकते. त्यामुळे भारतासाठी एक मोठी धोरणात्मक आर्थिक संधी निर्माण होते. भारताला भेट देणारा प्रत्येक आंतरराष्ट्रीय पर्यटक राष्ट्राच्या परकीय चलन गंगाजळीत थेट योगदान देत असल्याने अंतर्गत पर्यटन हे भारताची परकीय चलनाबाबतची आर्थिक स्थिती भक्कम करण्याच्या दृष्टीने अत्यंत शाश्वत व उच्चप्रभाव करणाऱ्या क्षेत्रांमध्ये गणले जाते.

      “बाहेरून येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढल्यास परकीय चलनाची गंगाजळी तर वाढतेच पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे जागतिक स्तरावरील गुंतवणूकदारांना एक ठोस संदेश त्यातून जातो,” असे श्रीकचरू म्हणाले.

      हॉस्पिटॅलिटी क्षेत्राची वाढ खुली करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे व नियम शिथिल करणे अत्यावश्यक ठरणार आहे. मंजुऱ्यांची प्रक्रिया सुलभ करणे, परवानग्यांचे प्रमाणीकरण करणे, प्रक्रियांना लागणारा कालावधी निश्चित राखणे तसेच लक्ष्याधारित उत्तेजने यांमुळे हॉटेल्स, सर्व्हिस्ड अपार्टमेंट्स आणि रिसॉर्ट्स यांमधील गुंतवणुकीला वेग मिळू शकतो. हे उपाय केल्यास हॉस्पिटॅलिटी क्षेत्रापुढील अडथळे कमी होतील, प्रकल्प वेगाने पूर्ण होतील, देशांतर्गत व परदेशी विकासकांना आकर्षित करून घेतले जाईल आणि पर्यटनाधारित वाढीला सहाय्य म्हणून निवासाची क्षमता वाढू शकेल.

      भारताच्या पर्यटन अर्थव्यवस्थेच्या संभाव्यता पूर्णपणे खुल्या करण्यासाठी सरकार व सर्व संबंधितांसह काम करण्यास तसेच इंडिया व्हिजन २०४७ पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका निभावण्यास हॉटेल असोसिएशन ऑफ इंडिया वचनबद्ध आहे. सूचना स्पष्ट आहे, संधी लक्षणीय आहे आणि सर्व संबंधितांमधील संलग्नता प्रोत्साहक आहे. आता यश मिळवायचे असेल तर वेग, आवाका व कार्यान्वयनातील अचूकता हे घटक निर्णायक आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

सीएसआर’ निधीच्या उपयोगातून महाराष्ट्रात प्रगतीचा नवा अध्याय – मुख्यमंत्री : टेक महा इम्पॅक्ट परिषदेचे आयोजन

सीएसआर’ निधीच्या उपयोगातून महाराष्ट्रात प्रगतीचा नवा अध्याय – मुख्यमंत्री…