Home सामाजिक महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 33 नागरिकांचे अर्ज दाखल

महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 33 नागरिकांचे अर्ज दाखल

30 second read
0
0
7

no images were found

महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 33 नागरिकांचे अर्ज दाखल

कोल्हापूर,  : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी व त्यांच्या अडचणी थेट जाणून घेण्यासाठी दर महिन्याच्या ५ तारखेला ‘जनता दरबाराचे आयोजन करण्यात येते. पंरतू या महिन्याच्या 5 तारखेला रविवार सार्वजनिक सुट्टी असल्याने हा जनता दरबार आज घेण्यात आला. हा जनता दरबार महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या जनता दरबारात 33 नागरिकांनी आपल्या विविध समस्या मांडत अर्ज दाखल केले.

            या जनता दरबारात महापौर सौ.रुपाराणी निकम यांनी नागरिकांच्या तक्रारी व मागण्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. तसेच प्राप्त झालेल्या तक्रारी तातडीने निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच आजच्या जनता दरबारात त्यांनी नागरीकांची आलेली संख्या लक्षात घेता ब-याच नागरीकांच्या समस्या पुर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्‍त केले.

            प्रारंभी जनता दरबार सुरु करताना महापौर सौ.रुपाराणी निकम यांनी सर्व नागरीकांना आपल्या समस्या थोडक्यात मांडण्याच्या सूचना दिल्या. तसेच मागील तक्रारी पुन्हा घेतल्या जाणार नसल्याचे सांगितले. या जनता दरबारामध्ये विविध विभागाचे 33 अर्ज असून यामध्ये उप-आयुक्त कार्यालयाशी 2, नगररचना विभागाशी 11, सामान्य प्रशासन विभागाशी 2, आस्थापना विभागाशी 1, उद्यान विभागाशी 4, इस्टेट विभागाशी 1, शहर अभियंता कार्यालयाशी 2, मुख्य आरोग्य निरिक्षक कार्यालयाशी 3, विभागीय कार्यालय क्रं. कडे 1, विभागीय कार्यालय क्रं.1 कडे 1, पाणी पुरवठा विभागाशी 1, आरोग्य प्रशासन विभागाशी 1, घरफाळ विभागाशी 1 व परवाना विभागाशी 1 अर्ज दाखल झाले आहेत.

            यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, सहा.आयुक्त राम काटकर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनील बिद्री, उपशहर रचनाकार एन.एस.पाटील, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्राबंरे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, परवाना अधिक्षक अशोक यादव, रवका अधिकारी प्रशांत पंडत, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, सहा.अभियंता नारायण पुजारी व विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

जन्म-मृत्युचे दाखले वितरणात दक्षता बाळगा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या सूचना

जन्म–मृत्युचे दाखले वितरणात दक्षता बाळगा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या सूचना कोल…