Home मनोरंजन अभिनेत्री जुई गडकरी झाली भावूक; ‘ठरलं तर मग’मध्ये सायलीला मिळणार तिची खरी ओळख

अभिनेत्री जुई गडकरी झाली भावूक; ‘ठरलं तर मग’मध्ये सायलीला मिळणार तिची खरी ओळख

6 second read
0
0
8

no images were found

अभिनेत्री जुई गडकरी झाली भावूक; ‘ठरलं तर मग’मध्ये सायलीला मिळणार तिची खरी ओळख

काही क्षण हे केवळ कथानकाला वळण देणारे नसतात, तर ते प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून जातात. ठरलं तर मगमध्येही असा एक अविस्मरणीय क्षण आता साकार होणार आहे. गेली साडेतीन वर्षे ज्या सत्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, ते अखेर समोर येणार आहे. सायली हीच तन्वी असल्याचं सर्वात मोठं रहस्य उलगडणार असून, तिच्या आयुष्यातील हा भावनिक क्षण प्रत्येकालाच भारावून टाकणारा आहे.

आतापर्यंत अनेक संकटांना सामोरी गेलेली सायली अखेर स्वतःची हरवलेली ओळख परत मिळवणार आहे. तिच्या आयुष्यातील या नव्या पर्वाची सुरुवात एका हृदयस्पर्शी गीताने होणार आहे.

कधी होतेस तू मर्दिनी, कधी हाती फुले तुझ्या

कधी डोळ्यात ठिणगी, कधी चांदणी, कधी दामिनी

प्रत्येक रूपात तू नवी, बदलून सारी नाती

झालीस सायलीची तन्वी… असे गाण्याचे शब्द आहेत.

सुप्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे यांनी लिहिलेल्या आणि निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीतांचं सुभाष नकाशे यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. या गाण्यातून सायलीच्या प्रवासातील प्रत्येक भाव, प्रत्येक संघर्ष आणि तिच्या नव्या जन्माचा आनंद व्यक्त करण्यात आला आहे. सायलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी स्टार प्रवाह परिवारातल्या नायिकाही खास हजेरी लावणार आहेत.

या विशेष प्रसंगाविषयी अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली, ‘सायलीच तन्वी असण्याचा प्रसंग इतक्या सुंदर पद्धतीने साकारला आहे की शूटिंग करतानाही अनेकदा डोळे पाणावले. प्रेक्षक सायलीवर मनापासून प्रेम करतात. सायली आजारी पडली की तिच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. हे पाहून कायम भारावून जायला होतं. एका कलाकाराला यापेक्षा मोठं बक्षीस असूच शकत नाही. हा क्षण प्रेक्षकांनाही तितकाच भावेल, याची मला खात्री आहे.’

सायलीच्या आयुष्यातील हा सुवर्णक्षण अनुभवण्यासाठी पाहायला विसरू नका ठरलं तर मग दररोज रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 33 नागरिकांचे अर्ज दाखल

महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 33 नागरिकांचे अर्ज दाखल कोल्हापूर,  : को…