no images were found
हेयरने गूगल टीव्ही आणि जेमिनी आधारित HQLED पी 7 प्रो स्मार्ट टीव्ही सीरिज भारतात लाँच
कोल्हापूर, : सलग १७ वर्षे जगातील नंबर १ ग्लोबल मेजर अॅप्लायन्सेस ब्रँड म्हणून मान्यता मिळवलेल्या हेयर अॅप्लायन्सेस इंडियाने अत्याधुनिक HQLED पी 7 प्रो स्मार्ट टीव्ही सीरिज भारतात लाँच केली आहे. ए आय -आधारित पिक्चर क्वालिटी, गूगल टीव्ही , जेमिनी आणि 50W 2.1 चॅनेल साउंड सिस्टिमसह ही नवीन मालिका होम एंटरटेनमेंटचा अनुभव अधिक समृद्ध करणारी ठरणार आहे.
या सीरिजमध्ये इंटिग्रेटेड सबवूफरसह 50W 2.1 चॅनेल स्पीकर सिस्टिम देण्यात आली असून डॉल्बी ऍट मस आणि टोटल सोनिक्स ® तंत्रज्ञानामुळे सिनेमागृहासारखा प्रभावी ध्वनी अनुभव मिळतो. HQLED डिस्प्ले, 93 टक्क्यांपर्यंत DCI-P3 कलर गॅमट, डॉल्बी व्हिजन , HDR10+ आणि AI पिक्चर
तंत्रज्ञानामुळे अधिक जिवंत रंग, उत्कृष्ट कॉन्ट्रास्ट आणि स्पष्ट दृश्यांचा अनुभव मिळतो.
गूगल टीव्ही आणि जेमिनी या AI-आधारित व्हॉइस असिस्टंटच्या मदतीने वापरकर्त्यांना कंटेंट शोधणे, माहिती मिळवणे आणि स्मार्ट होम डिव्हाइसेस नियंत्रित करणे अधिक सोपे झाले आहे. 2GB रॅम आणि 32GB रोम मुळे जलद आणि सुरळीत कार्यक्षमता मिळते.
HQLED P7 Pro सीरिज 75, 65, 55, 50 आणि 43 इंच अशा पाच स्क्रीन आकारांमध्ये उपलब्ध असून, याची प्रारंभिक किंमत ₹35,990 ठेवण्यात आली आहे. ही मालिका देशभरातील प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे.