Home शासकीय ‘प्रतापगड’ पर्यटकांसाठी खुला

‘प्रतापगड’ पर्यटकांसाठी खुला

0 second read
0
0
112

no images were found

‘प्रतापगड’ पर्यटकांसाठी खुला

प्रतापगड पर्यटकांसाठी शुक्रवारपासून खुला करण्यात आला आहे. गेल्या आठवडाभर अफजल खान कबरीवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम  सुरू होती. याकाळात जमावबंदी लागू करत प्रतापगड पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता.आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर स्थानिकांच्या मागणीनुसार प्रतापगडावरील पर्यटन सर्वांसाठी खुले करण्यात आले. गडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरी वरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम मागील आठवडय़ात सुरू करण्यात आली. यासाठी २ हजार पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात  होता. यासाठी परिसरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आला होता. पर्यटकच व  या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनाही गडावर ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली होती. या निर्णयामुळे स्थानिक नागरिक, व्यावसायिकांपासून ते र्पयटकांपर्यंत अनेकांची गैरसोय होत होती. पर्यटकांसोबतच गडावरील व्यावसायिकांनीही ही बंदी उठवण्याची मागणी केली होती. अफजल खान कबरीवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारपासून गडावरील बंदी आदेश मागे घेण्यात आला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…