Home सहकार क्षेत्र कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच ‘गोकुळ’वर प्रशासक नियुक्त !

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच ‘गोकुळ’वर प्रशासक नियुक्त !

0 second read
0
0
6

no images were found

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच ‘गोकुळ’वर प्रशासक नियुक्त !

कोल्हापूर : – राज्यातील सर्वात मोठ्या असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच ‘गोकुळ’वर प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम संस्था १९६० मधील संबंधित कलमानुसार हा आदेश काढण्यात आला आहे. पुणे विभागाचे विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी हा आदेश काढला असून संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने पुढील कारभारात अडचणी निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रशासकीय मंडळात ५ जणांचा समावेश असून सातारा जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांच्या अध्यक्षतेखाली चंदगडचे साहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, जुन्नर (पुणे) येथील साहाय्यक निबंधक सुनील धायगुडे, विशेष लेखापरीक्षक सागर बलकवडे, तसेच धर्मादाय रुग्णालय कक्षाचे अधक्ष चंद्रकांत परुळेकर यांचा समावेश आहे. हे मंडळ ५ मे पासून गोकुळचा कार्यभार हातात घेईल. या मंडळाला संघाच्या सर्व व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार देण्यात आले असून कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी संबंधित प्राधिकरणाची अनुमती घेणे बंधनकारक रहाणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सहकार क्षेत्र
Comments are closed.

Check Also

लोकशाही दिनी 106 तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

लोकशाही दिनी 106 तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश…