no images were found
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने गौतम अदाणी यांनी स्थानिक रोजगार, चांगले जीवनमान आणि कामगारांच्या सन्मानावर दिला भर
50,000 कामगारांसाठी वातानुकूलित निवासस्थान, रोज 1 लाख लोकांसाठी जेवणाची व्यवस्था
अहमदाबाद, : अदाणी ग्रुपचे चेअरमन गौतम अदाणी यांनी आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने ग्रुपच्या भविष्यातील धोरणाबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की आता कंपनी आपली प्रगती फक्त प्रोजेक्ट्स किंवा मालमत्तेवर मोजणार नाही, तर लोकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामावरही मोजणार आहे.
या निमित्ताने कर्मचारी आणि भागीदारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की अदाणी ग्रुप देशभरातील 24 राज्यांमध्ये 700 पेक्षा जास्त ठिकाणी काम करतो आणि सुमारे 4 लाख कर्मचारी, भागीदार आणि कंत्राटदारांसोबत कार्यरत आहे. आता अदाणी ग्रुप आपली प्रगती फक्त उभारलेल्या प्रकल्पांवर नाही, तर निर्माण झालेल्या रोजगारावर आणि सशक्त झालेल्या समाजावरही मोजणार आहे. त्यांनी असेही सांगितले की या विचारधारेत कामगारांना देशाच्या विकासाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.
गौतम अदाणी यांनी पुढे सांगितले की, अदाणी ग्रुपचे उद्दिष्ट फक्त प्रोजेक्ट पूर्ण करणे नाही, तर रोजगाराच्या संधी वाढवणे आणि समाजाला सशक्त करणे हे देखील आहे. कंपनीच्या मते, कर्मचारी, कंत्राटदार आणि भागीदार हे सर्व मिळून देशाच्या विकासात योगदान देतात.
गौतम अदाणी म्हणाले, “आपण जेव्हा एखादा प्रोजेक्ट पूर्ण करतो, तेव्हा आपण फक्त काम करत नाही, तर देशाचे भविष्य घडवत असतो. त्यांनी हेही स्पष्ट केले की आता सर्व प्रोजेक्ट साइट्सवर स्थानिक लोकांना प्राधान्य दिले जाईल. आधी आसपासच्या भागातील लोकांना संधी दिली जाईल, त्यानंतर राज्यातील इतर भागांतील लोकांना आणि गरज पडल्यास इतर ठिकाणांहूनआलेल्या लोकांना कामासाठी जोडले जाईल.
कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या जात आहेत. मुंद्रा आणि खावडा येथे सुमारे 50,000 कामगारांसाठी वातानुकूलित निवासस्थान सुविधेसह राहण्याची व्यवस्था केली जात आहे. याशिवाय मुंद्रा येथे एक क्लाउड किचन तयार केले जात आहे, जिथे दररोज जवळपास 1 लाख लोकांसाठी पौष्टिक अन्नउपलब्ध करून दिले जाईल. गौतम अदाणी म्हणाले, “ही कोणती विशेष सुविधा नाही, तर एक गरज आहे. प्रत्येक कामगाराला सन्मानाने जगण्याचा आणि काम करण्याचा अधिकार आहे.”
ग्रुप आपल्या काम करण्याच्या पद्धतीतही बदल करत आहे. निर्णय प्रक्रिया जलद करण्यासाठी त्रिस्तरीय सिस्टम लागू केली जात आहे. यामुळे साइटवरचे निर्णय आधीपेक्षा अधिक वेगाने घेता येतील.
याव्यतिरिक्त, कंपनी कंत्राटदार आणि भागीदारांसोबत दीर्घकाळ काम करण्याच्या मॉडेलवर भर देत आहे, ज्यामुळे कामाचा वेग आणि गुणवत्ता दोन्ही वाढतील. या मॉडेलमुळे छोट्या स्तरावर सुरुवात करणाऱ्या उद्योजकांनाही पुढे जाण्याची संधी मिळेल. तसेच या भागीदारांना वित्तीय मदत, ठराविक परतावा आणि दीर्घकाळ काम करण्याच्या संधीही दिल्या जातील.
गौतम अदाणी यांनी सांगितले की या पद्धतीमुळे स्थानिक स्तरावर व्यवसायांना चालना मिळत आहे. याचे उदाहरण देताना त्यांनी गुजरातच्या कच्छमधील हदू वेरसी रबारी यांचा उल्लेख केला. ज्यांनी एक पाण्याचा टँकर घेऊन कामाची सुरुवात केली होती आणि आज विविध यंत्रसामग्रीसह मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करणारा व्यवसाय उभा केला आहे.
या रणनीतीचा तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे शिक्षण आणि कौशल्यवाढ आहे. येणाऱ्या अदाणी स्किल्स सेंटरच्या माध्यमातून कामगारांना अनस्किल्ड कामापासून स्किल्ड, सुपरवायझर आणि पुढे नेतृत्वाच्या भूमिकांपर्यंत टप्प्याटप्प्याने पुढे जाण्याची संधी मिळेल.
यावेळी गौतम अदाणी यांनी सुब्बू यांची कहाणी सांगितली. सुब्बू यांनी कामगार म्हणून सुरुवात केली आणि सतत शिकत कॉर्पोरेट क्षेत्रात एक महत्त्वाचे पद मिळवले.
यातून हे दिसून येते की अदाणी ग्रुपमध्येच लोकांना पुढे जाण्याच्या संधी देण्यावर भर दिला जात आहे. त्यांचा हा प्रवास फक्त त्यांच्या वैयक्तिक प्रगतीचे उदाहरण नाही, तर त्यामुळे स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. अदाणी ग्रुप आता कौशल्य विकासावरही भर देत आहे. यासाठी कामगारांना प्रशिक्षण देऊन त्यांना पुढे जाण्याच्या संधी दिल्या जातील, जेणेकरून ते कालांतराने चांगल्या पदांपर्यंत पोहोचू शकतील.
मुंद्रा पोर्ट, खवडा रिन्युएबल एनर्जी पार्क, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गंगा एक्सप्रेसवे यांसारख्या मोठ्या प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, या केवळ पायाभूत सुविधा नाहीत, तर देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे साधन आहेत.