no images were found
टाकाळा येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून पाहणी
कोल्हापूर, : टाकाळा येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची आज सकाळी 8 वाजता आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक विजय जाधव, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, उप-शहर अभियंता अरुण गुर्जर, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील तसेच इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे उपस्थित होते. त्याचबरोबर महापौर सौ. रुपाराणी निकम या राजारामपुरी परिसरात स्वच्छता मोहिम राबवित असताना त्यांनीही या ठिकाणी भेट दिली.
या पाहणीदरम्यान आयुक्तांनी जलतरण तलावासह बॅडमिंटन हॉलची तपासणी करून खेळाडूंना आवश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. तलावाची गुणवत्ता आणि दर्जा अधिक सुधारण्यासाठी महापालिकेवर कोणताही बोजा न पडता सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) पद्धतीचा अवलंब करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच येथे येणाऱ्या खेळाडू व नागरिकांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळतील, असे वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यास सांगितले, जेणेकरून सरावासाठी उत्तम सुविधा उपलब्ध होतील. कोल्हापूर शहरामध्ये जलतरणामध्ये राष्ट्रीय खेळाडू तयार झाले आहेत. त्यामुळे आणखीन चांगले खेळाडू होण्यासाठी सदरचा तलाव अद्यावत असणे गरजेचे आहे. यानंतर त्यांनी शेजारील उद्यानास भेट देऊन त्याचीही पाहणी केली.