Home उद्योग अदाणी एंटरप्राइजेस लिमिटेडने चौथ्या तिमाहीचे आणि आर्थिक वर्ष 2026 चे निकाल जाहीर केले

अदाणी एंटरप्राइजेस लिमिटेडने चौथ्या तिमाहीचे आणि आर्थिक वर्ष 2026 चे निकाल जाहीर केले

2 second read
0
0
8

no images were found

अदाणी एंटरप्राइजेस लिमिटेडने चौथ्या तिमाहीचे आणि आर्थिक वर्ष 2026 चे निकाल जाहीर केले

एकत्रित ईबीआयटीडीए 16,464 कोटी इतका नोंदवला गेला
ईबीआयटीडीए पैकी 80% वाटा आता ‘कोअर इन्फ्रा-युटिलिटी’ पोर्टफोलिओ आणि खाणकाम सेवांमधून प्राप्त होत आहे

अहमदाबाद,: अदाणी समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या अदाणी एंटरप्राइजेस लिमिटेडने (एईएल), 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षाचे निकाल आज जाहीर केले. आर्थिक वर्ष 2026 च्या समाप्तीसह, एईएलने मुख्य पायाभूत सुविधा-आधारित व्यवसाय मॉडेल स्वीकारले आहे, ज्यामध्ये कंपनीचा 80% ईबीआयटीडीए (EBITDA) परिपक्व, दीर्घकालीन आणि करारबद्ध व्यवसायांमधून येत आहे, ज्यामुळे उत्पन्नाची स्पष्टता लक्षणीयरीत्या वाढली आहे. एईएलचा सुरुवातीचा इन्क्युबेशन टप्पा, ज्यामध्ये जास्त भांडवली गुंतवणूक आणि स्थिरीकरणाचे टप्पे होते, तो आता पूर्णपणे पार झाला आहे. ईबीआयटीडीए चे मिश्रण आता अधिक स्थिरतेकडे वळले आहे. यामुळे कंपनीला भविष्यात सातत्यपूर्ण रोख प्रवाह निर्माण करणे आणि मूल्यवृद्धीची संधी मिळण्याच्या दृष्टीने मजबूत स्थिती प्राप्त झाली आहे.

“अदाणी एंटरप्रायझेसने पुन्हा एकदा शिस्तबद्ध अंमलबजावणी, स्थिर ईबीआयटीडीए आणि मुख्य पायाभूत सुविधा तसेच इन्क्युबेशन प्लॅटफॉर्ममध्ये सातत्यपूर्ण प्रगती दाखवली आहे,” असे अदाणी समूहाचे अध्यक्ष श्री. गौतम अदाणी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “विशेष आनंदाची बाब म्हणजे आता आमच्या ईबीआयटीडीए चा बहुतांश भाग मुख्य पायाभूत सुविधा विकसित करणाऱ्या व्यवसायांमधून आणि स्थिर माइनिंग सेवांमधून येत आहे, जे आमच्या कार्यरत पोर्टफोलिओची परिपक्वता आणि विस्तार दर्शवते. आर्थिक वर्ष 2026 मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुवाहाटी विमानतळ आणि गंगा एक्सप्रेसवे यांसारख्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उभारणीमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. भारताचा विकास वेगाने वाढत असताना, आम्ही आमच्या मजबूत प्रकल्पांच्या जोरावर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक पायाभूत सुविधा व्यवसायांची उभारणी आणि विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

गोकुळची आगामी निवडणूक महायुती एकत्र लढवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील निर्णय

गोकुळची आगामी निवडणूक महायुती एकत्र लढवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत …