Home मनोरंजन भावुक कोर्टरूम ड्रामामध्ये अन्विताने जिंकली स्वातंत्र्याची लढाई, सोनी सबच्या इत्ती सी खुशी मध्ये

भावुक कोर्टरूम ड्रामामध्ये अन्विताने जिंकली स्वातंत्र्याची लढाई, सोनी सबच्या इत्ती सी खुशी मध्ये

5 second read
0
0
6

no images were found

भावुक कोर्टरूम ड्रामामध्ये अन्विताने जिंकली स्वातंत्र्याची लढाई, सोनी सबच्या इत्ती सी खुशी मध्ये

 ‘सोनी सबचा शो इत्ती सी खुशी अन्विता (सुम्बुल तौकीर खान) च्या प्रवासाची कहाणी सांगतो, एक तरुणी जी आपल्या भावंडांसाठी आयुष्याच्या कठीण प्रसंगांमध्येही ठामपणे उभी राहते. शो आता भावनिक आणि परिवर्तनकारी टप्प्यात प्रवेश करतो, जिथे अन्विताची भावंडांच्या कस्टडीसाठी आणि विषारी लग्नातून मुक्त होण्यासाठीची लढाई निर्णायक क्षणी पोहोचते.

 

आगामी भागांमध्ये कोर्टरूम ड्रामा एका शक्तिशाली निकालावर संपतो. अडथळे आणि कठोर अटी असूनही अन्विताचा निर्धार कधीच ढळत नाही. संजय (ऋषी सक्सेना) च्या कपटी वर्तनाचा सत्य अखेर उघड होतो जेव्हा माधुरी (उत्कर्षा नाईक) त्याच्याविरुद्ध साक्ष देते, हे सिद्ध करत की तो मुलांची काळजी घेण्यासाठी योग्य नाही. न्यायालय अन्विताच्या बाजूने निकाल देते, ज्यामुळे ती आपल्या वेदनादायी अध्यायातून मुक्त होते. तिची भावंडं भावनिक “इंडिपेंडन्स डे” साजरा करतात, जो उज्ज्वल भविष्याची हमी देतो. विराट सोबत असताना, अन्विता थोडा विराम घेण्याचा, स्वतःला पुन्हा शोधण्याचा आणि आपल्या कुकिंगच्या आवडीला पुढे नेण्याचा निर्णय घेते. शो लवकरच सहाÇ महिन्यांचा लीप घेईल, ज्यात अन्विताचा आत्मशोध आणि नवीन सुरुवातींचा प्रवास दाखवला जाईल.

नव्या सुरुवातींच्या उंबरठ्यावर, हा टप्पा अन्विता आणि विराटच्या बहुप्रतीक्षित प्रेमकथेची सुरुवात ठरेल का, की नियतीकडे अजूनही त्यांच्या वाट्याला काही वळणं शिल्लक आहेत?

 इत्ती सी खुशी’मध्ये अन्विता ही भूमिका साकारत असलेली सुम्बुल तौकीर खान म्हणाली, “अन्विताचा या क्षणापर्यंतचा प्रवास अत्यंत भावनिक राहिला आहे कारण हा फक्त कोर्ट केस जिंकण्याचा विषय नाही, तर तिचं आयुष्य परत मिळवण्याचा आहे. इतक्या काळापासून ती फक्त आपल्या भावंडांसाठीच नाही तर स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी आणि सन्मानासाठीही लढत होती. कोर्टरूम सीक्वेन्सचं शूटिंग खूप तीव्र होतं कारण त्यात अन्विताचा वेदना, ताकद आणि आशा सगळं पकडलं गेलं आहे. मला या टप्प्यातली सर्वात आवडती गोष्ट म्हणजे, सगळं सहन केल्यानंतर ती अखेर स्वतःला थांबण्याची आणि संघर्षांपलीकडे ती कोण आहे हे पुन्हा शोधण्याची संधी देते. ही विजय फक्त एका कठीण अध्यायाचा शेवट नाही तर एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे, जिथे अन्विता पुन्हा स्वतःसाठी स्वप्न पाहायला लागते.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची गुढी उंचच उंच जात राहो..’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची गुढी उंचच उंच जात राहो..’– मुख्यमंत…