Home औद्योगिक इसुझू मोटर्स इंडिया’च्या वतीने देशव्यापी ‘इसुझू आय-केअर प्री-समर कॅम्प’ची घोषणा

इसुझू मोटर्स इंडिया’च्या वतीने देशव्यापी ‘इसुझू आय-केअर प्री-समर कॅम्प’ची घोषणा

16 second read
0
0
9

no images were found

इसुझू मोटर्स इंडिया’च्या वतीने देशव्यापी ‘इसुझू आय-केअर प्री-समर कॅम्प’ची घोषणा

· ग्राहकांना दिनांक 23-28 मार्च 2026 दरम्यान इसुझू अधिकृत विक्रेता सेवा केंद्रांवर रोमांचक सेवा लाभ* मिळविणे शक्य

कोल्हापूर: सर्वोत्तम सेवा आणि मालकीचा अनुभव देण्याच्या इसुझूच्या वचनबद्धतेची पुष्टी करण्याच्या निरंतर प्रयत्नात, इसुझू मोटर्स इंडिया आपल्या इसुझू डी-मॅक्स पिक-अप्स आणि एसयूव्हीच्या श्रेणीसाठी देशव्यापी ‘इसुझू आय-केअर प्री-समर कॅम्प’ आयोजित करणार आहे. या सेवा शिबिराचा उद्देश ग्राहकांना देशभरातील हंगामात त्रास-मुक्त वाहन चालविण्याच्या अनुभवासाठी रोमांचक लाभ आणि प्रतिबंधात्मक देखभाल तपासणी उपलब्ध करून देणे हा आहे.

     दिनांक 23 ते 28 मार्च 2026 दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) सर्व इसुझू अधिकृत विक्रेता सेवा केंद्रांवर ‘इसुझू केअर’च्या पुढाकाराने उन्हाळीपूर्व शिबिराचे आयोजन केले जाईल. ग्राहकांना या कालावधीत, त्यांच्या वाहनांसाठी विशेष ऑफर आणि लाभ देखील मिळवता येतील.

     आग्रा, अहिल्यानगर, अहमदाबाद, अंबिकापूर, अनंतपूर, बारामुल्ला, बरेली, बारमेर, भरुच, भटिंडा, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, बिकानेर, बिलासपूर, कालिकत, छत्रपति संभाजी नगर, चेन्नई, चिकमंगरूळ, कोइम्बत्तुर, धुळे, दिल्ली, दिब्रुगढ, दिमापूर, दुर्गापूर, एर्नाकुलम, गांधीधाम, गोरखपूर, गुरुग्राम, गुवाहाटी, हावडा, हुबळ्ळी, हैदराबाद, इंदूर (2), जयगाव, जयपूर, जालंधर, जम्मू, जोधपूर, कडप्पा, कलबुर्गी, कर्नाल, कायमकुलम, खम्मम, कोल्हापूर, कोलकाता, कोट्टायम, करनूल, लातूर, एलबी नगर (हैदराबाद), लेह, लखनऊ, लुधियाना, मदुराई, मंडी, मंगळुरू, मेहसाणा, मोहाली, मुंबई (नेरुळ आणि बोरिवली), मुंद्रा, म्हैसूर, नागपूर, नाशिक, नेल्लोर, निजामाबाद, नोएडा, पटणा, पुणे, रायपूर, राजमुंद्री, राजकोट, रत्नागिरी, सातारा, शिवमोगा, सीकर, सिलीगुडी, सोलापूर, सुरत, थेनी, त्रिसुर, तिरुनेलवेली, तिरुपती, त्रिची, तिरुवनंतपुरम, वडोदरा, विजयवाडा आणि विजयपट्टणम येथे असलेल्या आयसुझूच्या सर्व अधिकृत सेवा सुविधांवर प्री-समर कॅम्प आयोजित करण्यात येईल.

       ग्राहकांना आपल्या जवळच्या इसुझू विक्रेता दालन किंवा https://www.isuzu.in/servicebooking.html वर भेट देऊन सेवा नोंदणी (सर्व्हिस बुकिंग) करता येईल. ग्राहक अधिक माहितीकरिता 1800 4199 188 (टोल फ्री)वर संपर्क करू शकतात.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In औद्योगिक
Comments are closed.

Check Also

गुढी पाडव्यानिमित्त डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रेत एक खास आकर्षण ठरले ते नेहरू मैदानात उभारलेली महाकाय दीडशे फुटांची गुढी

गुढी पाडव्यानिमित्त डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रेत एक खास आकर्षण ठरले ते नेहरू मैदानात …